Maharashtra Political Crisis: अजित पवार आणि कुटूंबियांवर भाजपसोबत जाण्यासाठी दबाव; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
Maharashtra Political Crisis:
Maharashtra Political Crisis: Sarkarnama

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या आठवड्यात याबाबत भाष्य केल्यानंतर अजित पवार यांच्या भाजप सोबत जाण्याच्या चर्चां सुरु झाल्या. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले. त्यानंतर आता दैनिक सामना'च्या रोखठोक या सदरातूनही याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Pressure on Ajit Pawar and family to join BJP; Sanjay Raut's secret blast)

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात (BJP) सामील होतील असे अयोध्येत गेलेले शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते.या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा.असं सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Political Crisis:
Union Cabinet News : केंद्रीय मंत्रिमंडळात मेमध्ये फेरबदल : शिंदे गटाला लागणार तीन मंत्रिपदाची लॉटरी; ही नावे चर्चेत

ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा अजित पवार, त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागलाच आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर ईडीच्या धाडी पडल्या व कारखाना जप्त केला, पण आता यासंबंधात ईडीने जे आरोपपत्र दाखल केले त्यात पवार किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे नाव नाही. मग जरंडेश्वर खरेदीच्या व्यवहारातील मनी लॉण्डरिंगच्या आरोपांचे काय झाले? की ते सर्व आरोप आणि धाडी राजकीय दबावासाठीच होत्या? असे दहशत व दबावाचे राजकारण महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते.असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics)

शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हे अनैतिक आहे. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे, ते 16 कोण? ज्यांच्यावर या ना त्या कारणाने खटले आहेत त्यांना धमकवायचे. हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबावर भाजपने हल्ले सुरू केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

Maharashtra Political Crisis:
Atique Ahmad News : अतिकच्या आयुष्याची चित्तरकथा..; वडील टांगा चालवायचे, मुलाने १७ व्या वर्षी केला पहिला खून ; महागड्या मोटारी..

गेल्या आठवड्यात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या गोष्टींवरही संजय राऊतांनी सामनात भाष्य केलं आहे. ''उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना (Sharad Pawar) भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण ’पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांमध्ये सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असे पवार-ठाकरे यांचे मत पडल्याचंही संजय राऊत यांनी सामनात म्हटलं आहे.

शरद पवार यांनी एक चांगला मुद्दा मांडला, ”आज जे भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या ईडी-सीबीआयच्या फाईली कधीच बंद होत नाहीत!” शिंद्यांबरोबर गेलेल्या 11 आमदार व 6 खासदारांच्या फायली सध्या टेबलावरून कपाटात गेल्या असल्याचं शरद पवार म्हणाल्याचे राऊत यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com