मुंबई उडवण्याच्या मेसेजचा छडा गुन्हे शाखा आणि एटीएस लावणारच ; फणसाळकरांचा निर्धार

Vivek Phansalkar : मी मुंबईकरांना आश्वस्त करतो.हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे.
Vivek Phansalkar
Vivek Phansalkar sarkarnama

मुंबई : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची (Mumbai Threat) धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेने कारवाईला सुरूवात केली आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचा तपास गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला आहे, अशी माहिती, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार' अशी धमकी देणाऱ्या मेसेजविषयी माहिती देताना पोलिस आयुक्त म्हणाले, "याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने कारवाईला सुरवात केली आहे. कसाब आणि अलजवाहीर सारख्या दहशदवाद्यांचा यात उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा आणि एटीएस करणार आहे,"

फणसाळकर म्हणाले, "गुन्हे शाखेचे तीन पथक व महाराष्ट्र एटीएस (ATS) यांच्यासोबत या प्रकरणाचा संयुक्तरित्या तपास करण्यात येत आहे. ज्या व्यक्तीने हे मेसेज केले आहेत, त्याचा तपास होत आहे जे नंबर दिले आहेत, नाव समोर आली आहेत. त्याचा शोध घेत आहोत. काही नंबर हे भारतातील दिसत आहेत. त्याचा तपास सुरूआहे. मेसेजमध्ये विविध दहशतवादी घटनाची उदाहरणे दिली आहेत. मी मुंबईकरांना आश्वस्त करतो.हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे,"

Vivek Phansalkar
मोठी बातमी : मुंबईवर 26/11 सारखा दुसरा हल्ला होणार ; थेट पाकिस्तानातून मेसेज

पोलीस कंट्रोल रुमला पाकिस्तानातून व्हॉट्सअप मेसेज आल्याची सूत्रांची माहिती आहे. हा मेसेज पाकिस्तानातून (pakistan)आल्याची माहिती आहे. गेल्या 3 दिवसांत दहशदवाद्यांशी संबंधित बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे.

'आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही 26/11 सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे 26/11 हल्ल्याच्या स्मृती ताज्या होतील. ही धमकी नाही याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.' असा मेसेज आला आहे.

दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे. धमकी देणाऱ्याने स्वतः तशी माहिती दिली आहे. या मेसेजविषयी अद्याप पोलिसांचे स्पष्टीकरण आले नाही. पण यामुळे मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com