Presidential election २०२२
Presidential election २०२२ sarkarnama

presidential elections result: मुर्मू आघाडीवर, खासदारांची मिळवली 540 मते

खासदारांच्या एकूण 748 मतांपैकी मुर्मू यांना 540 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना फक्त 208 मते मिळाली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (presidential elections results) मतमोजणी सुरू झाली आहे. रायसीना हिल्सच्या रेसमध्ये खासदारांची सर्वाधिक मते घेऊन द्रौपदी मुर्मू (draupadi murmus) या आघाडीवर आहेत. आता राज्यांमधील आमदारांची मतमोजणी सुरु होत आहे. यामध्ये मुर्मू या आघाडीवर असतील का , याची उत्सुकता सगळ्यांना आहे. (presidential elections result news update)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत आहे. सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आघाडीवर आहेत. 15 खासदारांची मते बाद ठरली आहेत. खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. खासदारांच्या एकूण 748 मतांपैकी मुर्मू यांना 540 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना फक्त 208 मते मिळाली आहे.

Presidential election २०२२
शिंदेंचा ठाकरेंना धक्का : मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, बंदी उठवली

भाजपने 21 जून रोजी मुर्मू यांना उमेदवारी दिली होती, तेव्हा एनडीएच्या खात्यात 5 लाख 63 हजार 825 म्हणजेच 52 टक्के मते होती. 24 विरोधी पक्षांसोबत असल्याने 4 लाख 80 हजार 748 म्हणजेच 44% मते सिन्हा यांच्याकडे विचारात घेतली जात होती. गेल्या 27 दिवसांत अनेक गैर-एनडीए पक्ष समर्थनार्थ आल्याने मुर्मू यांना निर्णायक आघाडी मिळाली. जर सर्व 10 लाख 86 हजार 431 मते पडली तर मुर्मू यांना 6.67 लाख (61%) पेक्षा जास्त मते मिळतील. सिन्हा यांची मते 4.19 लाख इतकी कमी झाली. विजयासाठी 5 लाख 40 हजार 065 मतांची गरज आहे.

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून १८५ ते १९० मते मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासमत ठरावावेळी १६४ आमदारांची मते मिळाली होती.ही मतसंख्या केवळ काही दिवसात तब्बल २० मतांनी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपची सातत्याने सुरु असलेली घोडदौड बघता नुकत्याच विरोधी बाकांवर फेकल्या गेलेल्या आमदारांनी मतपेटीतून संदेश पाठवायचे ठरवले आहे. त्याची यथायोग्य दखल घेत योग्य वेळी स्वागत करण्याचे करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात येते आहे.

शिंदे गटाने भाजपला पाठिंबा द्यायची तयारी सुरु केली होती तेव्हाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काही शिजत असल्याच्या चर्चांना जोर आला होता. राज्यसभा ,विधानपरिषद आणि पाठोपाठ सरकारबदलामुळे झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि सरकारच्या विश्वासमतात शिंदे फडणवीस यांनी उत्तम संख्याबळ संपादित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com