मुर्मू्ना मिळणार महाराष्ट्रातल्या १८५ ते १९० आमदारांची मते ; आज निकाल

Presidential Election Result | एकनाथ शिंदे यांना विश्वासमत ठरावावेळी १६४ आमदारांची मते मिळाली होती.ही मतसंख्या केवळ काही दिवसात तब्बल २० मतांनी वाढण्याची शक्यता आहे.
Draupadi Murmu
Draupadi Murmusarkarnama

मुंबई : देशाला आज नवे राष्ट्रपती मिळतील. सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी (president) झालेल्या मतदानाची मोजणी आज (गुरुवारी) होणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यात सामना आहे. (Presidential Election Result news update)

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून १८५ ते १९० मते मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासमत ठरावावेळी १६४ आमदारांची मते मिळाली होती.ही मतसंख्या केवळ काही दिवसात तब्बल २० मतांनी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपची सातत्याने सुरु असलेली घोडदौड बघता नुकत्याच विरोधी बाकांवर फेकल्या गेलेल्या आमदारांनी मतपेटीतून संदेश पाठवायचे ठरवले आहे. त्याची यथायोग्य दखल घेत योग्य वेळी स्वागत करण्याचे करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात येते आहे.

शिंदे गटाने भाजपला पाठिंबा द्यायची तयारी सुरु केली होती तेव्हाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काही शिजत असल्याच्या चर्चांना जोर आला होता. राज्यसभा ,विधानपरिषद आणि पाठोपाठ सरकारबदलामुळे झालेल्या विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि सरकारच्या विश्वासमतात शिंदे फडणवीस यांनी उत्तम संख्याबळ संपादित केले.

Draupadi Murmu
योगी सरकारच्या पहिल्या मंत्र्याचा राजीनामा ; 'लेटर बॅाम्ब' व्हायरल

आता कॉंग्रेसमधील काही आमदार आपले मत कमळदलाचरणी अर्पण करायला सरसावले आहेत असे विश्वसनीयरित्या समजते.कॉंग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता असल्याने विधानपरिषदेत त्यांनी दाखल केलेले उमेदवार चंद्रकांत हांडोरे पडले होते. दलित असूनही त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. कॉंग्रेसचा परंपरागत मतदार त्यामुळे नाराज झाला आहे. मात्र आमदार स्वत:च्याच मर्जीचे मालक असल्याप्रमाणे वागत असल्याने कॉंग्रेसने अद्याप मते का फुटली हे विचारणाऱ्या नोटिसी बजावलेल्या नाहीत.

कॉंग्रेसची किती मते मुर्मू यांना मिळतील असे विचारले असता एका ज्येष्ठ नेत्याने सरळ उत्तर न देता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनही मते मिळतील की असे उत्तर दिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटातील मतेही त्यांनी पाठिंबा जाहीर केल्याने मुर्मूंना मिळणार आहेत याकडेही या नेत्याने लक्ष वेधले. कॉंग्रेसची विदर्भ मराठवाडयातील लक्षणीय संख्येतील मते तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले एखादे मत फुटणार असल्याचे बोलले जात होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकही मत फुटणार नाही..

कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मते फुटण्याची शक्यता फेटाळून लावली मात्र तसे झालेच सक्त कारवाई केली जाईल असे आमदारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकही मत फुटणार नाही असा दावा केला.महाराष्ट्रातील ७० टक्के आमदारांची मते द्रौपदीताई मुर्मू यांना मिळणार असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. ही संख्या २०० च्या वर जाते.

व्यूहरचना शिंदेची की फडणवीसांची?

मुख्यमंत्री शिंदे यांनीही तसेच सांगितले आहे.मात्र या वेळी मुर्मूंचा विजय निश्चित असल्याने असावे पण मते फिरवण्यात वाकबगार असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती पणाला लावली नाही असे सांगितले जाते. माध्यमांशी बोलताना या निवडणुकीत गुप्त मतदान केले जाते ,ते सद्सद्विवेक बुध्दीला स्मरून केले जाईल .आमदारांचे समर्थन वाढेल असे विधान मात्र फडणवीस यांनी केले होते.२०० मते मिळाली तर त्यामागची व्यूहरचना शिंदेची की फडणवीसांची असा प्रश्न निर्माण होणार हे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in