Presidential Election : राजनाथ सिंह यांचा उद्धव ठाकरेंना फोन

उद्धव ठाकरे-राजनाथ सिंह यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे, हे दोन्ही नेते भेटणार असल्याची समजते.
Rajnath Singh, Uddhav Thackeray
Rajnath Singh, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्याची जबाबदारी भाजपने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांच्यावर सोपवली आहे. राजनाथ सिंह हे सध्या सर्वानुमते योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. (Presidential Election news updates)

राष्ट्रपती पदाची निडणूक १८ जूलै रोजी होणार आहे. २९ जूनपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंह चर्चा करत आहेत.

भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये रणनिती आखण्यात येत आहे. विरोधकांकडून मोर्चे बांधणी करण्यात येत असताना भाजपकडून उमेदवारावर एकमत करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. उद्धव ठाकरे-राजनाथ सिंह यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे, हे दोन्ही नेते भेटणार असल्याची समजते. या चर्चेमध्ये राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

Rajnath Singh, Uddhav Thackeray
विधान परिषद : आघाडीच्या नेत्यांची धाकधुक वाढली ; बविआची मते भाजपच्या पारड्यात ?

राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीसुद्धा काल फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडे राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती पदाबाबत समर्थन देण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे,टीएमसीच्या ममता बॅनर्जी, आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी राजनाथ सिंह यांनी घेतल्या आहेत. त्यांनी शरद पवार यांच्याशीसुद्धा फोनवरुन चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला समर्थन देण्याची मागणी केली आहे.

Rajnath Singh, Uddhav Thackeray
धक्कादायक : भाजप नेत्याने केली गोळ्या झाडून पत्नीची हत्या, नंतर स्वतःवरही गोळीबार

तृणमूल काँग्रेसने महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांची नावे सुचवली आहेत. गुलाम नबी आझाद आणि यशवंत सिन्हा यांचेही नाव चर्चेत आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेत्यांची दिल्लीत टीएमसी नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक आयोजित केली होती. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे बुधवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीला १८ नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com