श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर ; मोदींनीच तो देश आता सावरावा

आंदोलकांवर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात येत आहे.
Sri Lanka crisis latest news
Sri Lanka crisis latest newssarkarnama

कोलंबो : श्रीलंकेचे (Emergency in Sri Lanka) पंतप्रधान रानिल विक्रनसिंघे यांची देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले आहेत. आंदोलकांनी राष्ट्रीय टीव्ही 'रूपवाहिनी'चा स्टुडिओ ताब्यात घेतला, त्यानंतर वाहिनी बंद झाली आहे. जनतेचा तीव्र विरोध लक्षात घेऊन रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. (Sri Lanka crisis latest news)

राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर श्रीलंकनवासीय संतापले आहेत. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे. आंदोलकांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांवर हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात येत आहे.

अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली. त्यात 12 जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेत हजारो लोक संसद भवन आणि पंतप्रधान भवनाकडे धावत आहेत. आंदोलक संसद भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घातला आहे.

Sri Lanka crisis latest news
Shivsena: शिवसेनेच्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार ; दीपक केसरकरांचा गंभीर आरोप

राजपक्षे यांना पत्नी आणि दोन अंगरक्षकांसहीत मालदीवमध्ये प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन, सीमाशुल्क आणि इतर कायद्यांबाबत संरक्षण मंत्रालयाकडून संपूर्ण परवानगी देण्यात आली होती. आज (ता.13) सकाळी त्यांना हवाई दलाचे विमान उपलब्ध करून देण्यात आले.ते सध्या मालदीवमध्ये वास्तव्यास आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in