नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये BMC निवडणूकांसाठी तयार रहा; भाजप नेत्याचे आदेश

BMC Election| BJP| भाजपने आगामी महापालिका निवडणूकांसाठी कंबर कसली आहे.
BMC Election| BJP|
BMC Election| BJP|

मुंबई : भाजपने आगामी महापालिका निवडणूकांसाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने त्यांनी तशी तयारीही सुरु केली आहे. कालच भाजप नेते अतूल भातखळकर यांनी नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये होणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.

भातखळकर म्हणाले की, भाजपकडून मुंबईतील २२७ प्रभागांचे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार जनतेचा कल भाजपकडे असल्याचे दिसून आले आहे. आमची निवडणूक ही मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त आणि रस्ते आणि पाण्याचा तुटवडा यांसारख्या नागरी समस्यांपासून दूर करण्यासाठी असेल.

BMC Election| BJP|
Pune Crime ! पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल

शुक्रवारी भाजपच्या मुंबई युनिटने पालघर जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आमदार आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय परिषद सुरू केली आहे. 3-4 महिन्यांचा संघटनात्मक आराखडा तयार करण्यात आला आहे. 2017 मध्ये भाजपने महापालिकेच्या 82 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी अमित शहा यांनी 150 चे लक्ष्य ठेवले आहे. असल्याचे भातखळकर यांनी सांगितले. तर, पक्ष बहुमत मिळवून पारदर्शक सरकार देईल. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेची कोंडी करण्यासाठीही भाजपने मोठी तयारी केल्याची माहिती आहे. आगामी महापालिकांच्या निवडणूकांपूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रान पेटवण्याची जबाबदारी मुंबईतील तीन खासदार व आमदारांवर देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील कोरोना रुग्णालय उभारणीतील गैरव्यवहार, रस्त्यांचे डांबरीकरणातील गैरव्यवहार, आदी प्रकरणांवरुन शिवसेनेला घेरण्याची तयारी भाजपने केली आहेत.

मुंबईतील शहर व उपनगरात अनेक टॉवर्सना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या टँकरलॉबीच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार होतो. सत्ताधाऱ्यांचे यांना आशिर्वाद आहे, अशा काही प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या या आमदार खासदारांकडून मुख्य मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेमागे चौकशीचे फेरे लागण्याची शक्यता आहे. त्यातच न्यायालयांमध्ये काही प्रकरणे दाखल करून शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in