MNS News : संघर्षाची तयारी पुन्हा एकदा भरारी; मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच मनसे फुंकणार रणशिंग

Raj Thackeray : ९ मार्चला मनसेचा वर्धापनदिन ठाण्यात साजरा होणार
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

MNS News : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाण्याला राजकीय दृष्ट्या महत्व प्राप्त झालं आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील ठाण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे साजरा होणार आहे.

या पार्श्वभूमीवरच 'संघर्षाची तयारी, पुन्हा एकदा भरारी' अशा आशयाचे पोस्टर्स मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राज ठाकरे हे देखील ९ मार्चला ठाण्यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray
BJP Mission 150: मुंबई महापालिकेसाठी भाजपचे 'मिशन 150'; असा आहे मेगाप्लॅन

मनसे यंदा आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठाण्यात घेणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग मनसे येथूनच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज ठाकरे आणि शिंदेंची जवळीक वाढली आहे. मनसेच्या दोन-तीन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.

Raj Thackeray
Aaditya Thackeray : ''आमच्या सभेला जनतेची तर घटनाबाह्य,गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्यांची गर्दी..''

आता मनसे ठाण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेत असल्याने ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला बळ मिळेल असे बोलले जात आहे. तसेच आगामी निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि मनसे अशा युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता ठाण्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Raj Thackeray
Eknath Shinde News: शिंदेंना बालेकिल्ल्यातच रोखण्यासाचा भाजपाचा डाव? श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघात हालचाली वाढल्या

दरम्यान, राज ठाकरे हे ठाण्यात येणार असल्याने ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर याआधी शिवसेनेनेही (ठाकरे गट) काही प्रमुख सभा ह्या ठाण्यात घेतल्या आहेत. तर आता मनसे देखील आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम तेथेच घेणार असल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com