एकनाथ शिंदेंच्या बंडाची प्राथमिक तयारी फडणवीस-पाटलांकडूनच

विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शिवसेनेतील या बंडाळीची तयारी करण्यात येत होती.
Fadanvis-Thackeray-Shinde
Fadanvis-Thackeray-ShindeSarkarnama

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना गेल्या आठ दिवसांपासून एकनाथ शिंदेंसह त्यांच्या समर्थक आमदारांचीदेखील तयारी सुरू होती. या काळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी एकनाथ शिंदे यांचा संपर्क करून दिला होता. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सोमवारी विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांसह सुरतच्या दिशेने कूच केल्याचे सांगण्यात येत आहे.

Fadanvis-Thackeray-Shinde
Aurangabad : बालेकिल्ल्यातील सात पैकी पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शिवसेनेतील या बंडाळीची तयारी करण्यात येत होती. विधान परिषदेच्या निवडणुकीबरोबरच पुढची दिशा शिंदे यांनी ठरवली होती. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसनेचे उमेदवार निवडून येतील, अशी काळजी घेण्यात आली. मतदान झाल्यानंतर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सोमवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सुरतला जाण्यासाठी निघाले.

Fadanvis-Thackeray-Shinde
एकनाथ शिंदे अजितदादांपेक्षा वजनदार निघाले; ३५ आमदार घेवून बाहेर पडले...

शिंदे यांच्यासोबत सुरतला असलेल्या आमदारांशिवाय काहीजण असे आहेत जे मुंबईत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. गेल्या काही दिवसातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका शिंदे यांच्यासह अनेक आमदारांना मान्य नव्हती. राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसने पुरेशी मदत केली नव्हती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला शिवसेनेने मदत करू नये,अशी या आमदारांची भूमिका होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला मदत करण्याचा निर्णय घेतला होता.

अडीच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा सुरू करण्यात आली होती. अडीच वर्षात राज्यात अनेक घडामोडी घडल्या. मात्र, अखेर अडीच वर्ष ज्याची चर्चा होती ते शिंदे यांचे बंड प्रत्यक्षात आले. शिंदे नाराज असले तरी त्यांच्यासोबत इतक्या मोठ्या संख्येने आमदार जाऊ शकतील याची कल्पना कोणत्याही राजकीय पंडीतांना नव्हती. नजीकच्या काळात राजकीय घडामोडी काय वळण घेतात हे नेमकेपणाने सांगणे अवघड असले तरी शिंदे यांचे बंड सर्वांचा अंदाज चुकविणारे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com