Pravin Darekar सहा महिन्यांतच वचपा काढणार..फडणवीस सत्तेवर येताच लाॅटरी

Mumbai Bank अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग खुला...
Bjp Leader Pravin Darekar
Bjp Leader Pravin DarekarSarkarnama

मुंबई : Mumbai Bank राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसणार असून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतही सत्तापालट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या उद्या (शुक्रवारी) पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक होणार आहेत.

बॅंकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त झाली आहेत. गेल्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस यांनी एकत्र येऊन दरेकर यांची अध्यक्षपदाची संधी हिसकावून घेतली होती. आता मात्र सहा महिन्यांच्या आतच दरेकर पुन्हा अध्यक्ष होणार आहेत.

Bjp Leader Pravin Darekar
'शिंदे-फडणवीसांना ८ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही!'

बॅंकेच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद लाड यांचा कांबळे यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत भाजपला चकवा देण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यशस्वी झाले होते. बॅंकेचे अध्यक्षपद भाजपकडे राहील, अशा रीतीने प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सर्पवक्षीय पॅनेलची रणनीती आखली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडीकडेच अध्यक्षपद घेण्याचा निर्णय झाला. भाजपचे विष्णू भोंगळे यांनी ऐनवेळी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीला अध्यक्षपदासाठी मतदान केले होते. उपाध्यक्ष पद मात्र चिठ्ठीवर मिळविण्यात भाजपला यश आले होते. आता दोन्ही पदे रिक्त झाली आहेत.

Bjp Leader Pravin Darekar
CM शिंदेंना आरामाचा सल्ला; मंत्र्यांची यादी घेवून फडणवीस दिल्लीला रवाना

संचालकांत शिवसेना +राष्ट्रवादी काँग्रेस, असे एकूण ११ संचालक होते. भाजपकडे ९ संचालक होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे ताकद होती. निवडणूक लढविताना सर्वपक्षीय म्हणूनच हे संचालक निवडून आले होते. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने स्वतंत्र चूल तयार केली आणि दरेकर व लाड जोडीला चकवा दिला होता. त्याचा वचपा काढण्याची संधी दरेकर यांना मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com