प्रविण दरेकरांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा

प्रविण दरेकरांना सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार नाही.
प्रविण दरेकरांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा

Mahesh Tapase NCP- Pravin Darekar BJP 

Sarkarnama 

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचेच वर्चस्व राहिले. मात्र, निकाल लागल्यानंतर लगेचच सहकार विभागाने ते मजूर नसल्याचे सांगत अपात्र ठरवले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रवीण दरेकरांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Mahesh Tapase NCP- Pravin Darekar BJP&nbsp;</p></div>
सहकार विभागाच्या कारवाईआधीच दरेकरांनी दिला पदाचा राजीनामा

स्वतःला मजूर म्हणवून घेत लोकांची फसवणूक करणारे आणि प्रतिज्ञापत्रात उद्योजक असल्याचे दाखवणार्‍या प्रविण दरेकरांना सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महेश तपासे केली आहे.

प्रवीण दरेकरांनी मुंबै बॅंक निवडणूकीत स्वतःला मजुर असल्याचं दाखवलं आणि विधानपरिषदेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उद्योजक असल्याचं दाखवल, असे करुन प्रवीण दरेकरांनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. बॅंक निवडणूक जिंकूनही राज्याच्या सहकार विभागाने प्रविण दरेकरांना अपात्र घोषित केले. भाजपचा एक जबाबदार नेता जनतेच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असेल तर भाजपकडे नैतिकता आहे का, असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे दरेकरांनी विरोधी पक्षनेतेपदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील सहकार विभागाने कारवाई करून प्रवीण दरेकर यांना अपात्र ठरवले, तेव्हा या सगळ्या गोष्टी सर्वांच्या नजरे समोर आल्या. परंतु आता प्रवीण दरेकर स्वतः नैतिकतेचा कुठला आधार घेतात व काय मूल्य वापरतात हे बघण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे जनतेची फसवणूक करणारे, त्यांना खोटे सांगणारे, स्वतःला एकीकडे मजूर म्हणणारे आणि दुसरीकडे उद्योगपती म्हणणारे यांना सार्वजनिक जीवनात राहण्याचा अधिकार नाही. आणि म्हणूनच प्रवीण दरेकर जी यांनी ताबडतोब विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा असे आमचे स्पष्ट मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.