'कोल्हापुरात शिवसेनेची मते भाजपला मिळाली!'

कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपला (BJP) 77 हजार 426 एवढी मते मिळवली आहेत.
'कोल्हापुरात शिवसेनेची मते भाजपला मिळाली!'
Praveen Darekarsarkarnama

मुंबई : या विजयाबद्दल आम्ही महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अभिनंदन करतो. भाजप (BJP) 18 हजार 500 मतांनी मागे राहिली. आम्ही पराभव स्वीकारतो. मात्र, हिंदुत्व प्रेमी जनतेने भाजप मतदान केले. गेल्यावेळी शिवसेनेचे (ShivSena) उमेदवार राजेश श्रीरसागर यांना 69 हजार मतदान झाले होते. मात्र, या निवडणुकीत 5 हजार मते काँग्रेसची (Congress) वाढली. भाजपलाही 77 हजार 426 एवढी मते मिळवली आहेत. त्यामुळे शिवसेनेची हिंदुत्ववादी मतेही भाजपला मिळाली आहेत, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केला. त्यावर प्रवीण दरेकर मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी दरेकर म्हणाले, जयश्री जाधव यांना सहानुभती मिळाली. 18 हजार मतांचा गॅप आम्ही 2024 ला भरून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्वांना इतकी भीती होती ही जागा आली तर सरकारला धोका निर्माण होईल, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

Praveen Darekar
भाजपसह चार पक्षांची आघाडी विरोधात उतरूनही तेजस्वी यादवांनी मारलं मैदान!

भाजपचा पराभव झाला असला तरी इथल्या जनतेने पक्षाला पाठबळ दिले आहे. याच बरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की निवडणुक हरलो तर हिमालयात जाईल त्यांच्या या विधानवरुन महाविकास आघाडीचे नेते त्यांना ट्रोल करत आहेत. त्यावर दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले, या राज्यात मोठं मोठ्या नेत्यांनी काय काय वक्तव्य केली माहिती आहेत. आजवर अनेक नेते म्हणाले मी हिमालयात जाईन, त्यामुळे चंद्रकांतदादा म्हणाले त्याचा शब्दश: अर्थ काढू नये, असेही दरेकर यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली ते म्हणाले, इकडे आयजीच्या जीवावर बायजी उदार झाले आहे. संजय राऊत यांनी अर्ध्या हलकुंडाने पिवळ होऊ नये, असा टोला लगावला. भोंगया बाबत बाळासाहेब ठाकरे यांची काय भूमिका होती, हे संजय राऊत यांनी समजून घ्यावे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीने एकत्र लढायला हवे. पोटनिवडणूक जमून जाते. मात्र, जेव्हा विधानसभा येईल तेव्हा खरे चित्र समोर येईल, असेही दरेकर यांनी सांगितले.

Praveen Darekar
शिवसेनेच्या मतांबाबत सतेज पाटील म्हणाले...

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या संदर्भात ते म्हणाले, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी अवस्था दिसते. राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती आताच निर्माण झालेली आहे. कारण मंत्री जेलमध्ये आहेत. शेतकरी, एसटी कर्मचारी, वीज प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र, आमचा डाव असता तर आम्ही या पूर्वीच राष्ट्रपती राजवट लावली असती. जर राष्ट्रपती राजवटी सारखी परिस्थिती निर्माण झाली. तर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावत असते. मात्र, पक्षीय द्वेषातून आणि सूड भावनेतून राष्ट्रपती राजवट लागत नाही, अशे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.