नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार

नवाब मलिकांच्या जावयाला जानेवारी महिन्यात अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना आणि राज्यसरकारला चांगलेच कोडींत पकडले आहे
नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार
Nawab Malik- Praveen Darekar Sarkarnama

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी त्यांच्या जावयाला झालेल्या अटकेवरुन एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. मलिकांनी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केला. मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जावई समीर खानच्या (Sameer Khan) अटक प्रकरणावरुन समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला. नवाब मलिकांच्या जावयाला जानेवारी महिन्यात अटक झाल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना आणि राज्यसरकारला चांगलेच कोडींत पकडले आहे. मात्र मंत्री मलिक यांनी पत्रका परिषदेत एनसीबीवर निषाणा साधला. मात्र विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पुन्हा नवाब मलिकांवर पलटवार केला आहे.

Nawab Malik- Praveen Darekar
नवाब मलिकांच्या गंभीर आरोपांवर NCBचे वानखेडे म्हणाले..

नवाब मलिक एनसीबीला कोंडींत पकडण्याचा प्रयत्न करत असून ते यंत्रणेवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. पण या तपास यंत्रणा दबावाला बळी पडणार नाहीत. नबाव मलिक तपास यंत्रणांवर अथोरिटी अ्सलेली वक्तव्ये करत आहेत. एनसीबीने केलेली कारवाई चूकीची आहे. ते अमली पदार्थ नव्हते, असे ते म्हणत आहेत, पण अशीअथोरिटी असलेली वक्तव्ये करणे चूकीचे आहे. त्यासाठी न्यायालय आहे, त्यांच्या जावयाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नबाव मलिकांच्या जावयाला जी अटक झाली आहे आणि जनमानसात बदनाम झाले आहेत. त्याची मळमळ आणि सूडभावना त्यांच्या पत्रकार परिदेच्या माध्यमातून दिसत आहेत, असा सणसणीत टोला त्यांनी नवाब मलिकांवर केला आहे.

तसेच, नवाब मलिक, त्यांच्या जावयावर झालेल्या कारवाईच्या विरोधात केंद्राची समिती पाहिजे, आयोग, पाहिजे, कारवाई करण्यासारख्या अनेक मागण्या करत आहे पाहिजे, त्यांना कोणी अडवलं आहे. त्यासाठी त्यांनी राज्यसरकारकडून केंद्रसरकारला मागणी करावी, त्यांच्या मागणीवर केंद्रसरकार विचार करुन पुढील कारवाई करेल, असे प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे. तसेच, राज्य सरकार तुमच्या अंतर्गत आहे. तुम्हीही राज्यसरकराच्या अंतर्गत जी कारवाई करु शकत असाल त्या गोष्टी तुम्हाला करता येतील. पण एनसीबीने केलेली कारवाई चुकीची आहे, हे प्रसारमाध्यमांमधून पसरवण्याचे कामम नवाब मलिक करत आहेत. तसेच, घटनेने वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा स्थापित केल्या आहे. तिथे अन्याय झाला तर आपण वर दाद मागू शकतो. पण आपणच न्यायव्यवस्थेसारखा निवाडा करणे, तसे बोलणे हे न्यायव्यवस्थेचा आपमान आहे. असा टोलाही प्रवीण दरेकरांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.