एनसीबीबाबत नवाब मलिकांना पोटशूळ: प्रवीण दरेकरांचा पलटवार
Nawab Malik - Pravin Darekar Sarkarnama

एनसीबीबाबत नवाब मलिकांना पोटशूळ: प्रवीण दरेकरांचा पलटवार

मुंबई क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी सोडलेल्या दोन जणांपैकी एक भाजप नेत्याचा मेव्हणा, तर दुसऱ्याचेही राजकीय संबंध असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

''तपास यंत्रणांबाबत आपल्याला काही माहिती आहे, अशा अविर्भावत मंत्री नवाब मलिक राजकीय वक्तव्य करत आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. '' असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या आरोप फेटाळून लावले आहेत.

अमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) मुंबईच्या क्रुझशिपवर केलेल्या कारवाई मध्ये १० जणांना पकडले होते. त्यातल्या दोघांना सोडण्यात आले. त्या दोघांपैकी एकजण भारतीय जनता पक्षाच्या (BJP) हायप्रोफाईल नेत्याचा मेव्हणा आहे, तर दुसऱ्याचेही राजकीय संबंध आहेत. मात्र एनसीबीने (NCB) त्याची कोणतीही चौकशी न करता त्यांना सोडले, असा आरोप मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) केला होता. तसेच, याबाबत उद्या दुपारी व्हिडीओसह सर्व पुरावे आपण जाहीर करणार असल्याचेही त्यांना सांगितले होते.

Nawab Malik - Pravin Darekar
'गुरुमाऊलीच्या नेत्यांनी व संचालकांनी बँकेची इभ्रत घालवली'

यावर प्रवीण दरेकरांनी नवाब मलिकांचे सर्व आरोपांवर पलटवार केला आहे. ''नवाब मलिकांकडे कोणतेही पुरावे असतील, जर या प्रकरणात कोणता भाजप नेता असेल तर एनसीबी त्याच्यावर कारवाई करेलच. पण जर नबाव मलिक यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे असतील तर त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये वेळ न घालवता त्यांनी एनसीबीकडे तक्रार करावी. त्यांना इनपुटस् द्यावेत, जेणेकरुन त्याना तपास करायला अजून सोपे जाईल,'' असे दरेकरांनी म्हटल आहे.

तसेच, नबाव मलिक आणि एनसीबीचा संबंध सर्वश्रुत आहे. त्यांच्या जावयाच्या बाततीत जे झालं, त्याचा उल्लेख मी करु इच्छित नाही. म्हणूनच एनसीबीबाबत नवाब मलिक यांच्या मनात जो पोटशूळ आहे,जो संताप आहे, तो संधी मिळेल तिथे काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका स्पष्ट केली, त्यावर वारंवार आरोप करणे, संशय व्यक्त करणे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे, योग्य नाही. एनसीबी ही देशातील विश्वासार्ह तपास यंत्रणा आहे, धोकादायक अमली पदार्थांच्या व्यसनाने आपल्याल्या घेरु नये यासाठी ही यंत्रणा काम करत आहेत. मात्र ते या यंत्रणेवरच संशय व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.