१० जूनपासून देवेंद्र फडणविसांच्या घरी फक्त पेढे खाण्याचा कार्यक्रम!

Devendra Fadnavis | BJP : देवेंद्र फडणवीस यांनी पेढे भरवून प्रविण दरेकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
Devendra Fadnavis | BJP
Devendra Fadnavis | BJPSarkarnama

मुंबई : राज्यात सत्तांतराचा परिणाम मुंबई बँकेतील सत्तेवरही झाला आहे. अवघ्या ६ महिन्यात महाविकास आघाडीला धक्का देत भाजप (BJP) नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी बँकेच्या अध्यक्षपदी पुनरागमन केले आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांची निवड झालेली आहे. (Mumbai District Central Cooperative Bank News) आज बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बिनविरोध निवड पार पडली.

दरम्यान, या निवडीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर निवासस्थानी मागच्या दोन महिन्यात जवळपास पाचव्यांदा पेढे खाण्याचा कार्यक्रम पार पडला. आज नवनियुक्त अध्यक्ष प्रविण दरेकर आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे या दोघांनीही सागर निवासस्थानी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी पेढे भरवून दोघांचेही मन:पूर्वक अभिनंदन केले.

भाजपने मागील २ महिन्यांमध्ये देवेंद्र फडणवीसंच्या नेतृत्वात अशक्य वाटणारे विजय नोंदवले. १० जुनला धनंजय महाडिक यांच्यारुपाने राज्यसभेची तिसरी जागा जिंकली. त्यामुळे पहिल्यांदा पेढे खाण्याचा योग आला. त्यानंतर २० जुनला प्रसाद लाड यांच्यारुपाने विधानपरिषदेची पाचवी जागा जिंकली. त्यामुळे दुसऱ्यांदा मोठे सेलिब्रेशन झाले. महिन्याभराच्या आत तिसऱ्यांदा म्हणजे ३० जुनला राज्यातील सत्तांतरानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तिसऱ्यांदा पेढे खाण्याचा कार्यक्रम झाला.

जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर २१ जुलै रोजी चौथ्यांदा मोठे सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर आता दरेकर यांच्या रुपाने फडणवीस यांच्या निवासस्थानी पाचव्यांदा मोठे सेलिब्रेशन साजरे करण्यात आले. या विजयोत्सवाचे फोटो फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com