Pratapgad : अफझल खान कबर वाद ; आज 'सर्वोच्च' सुनावणी

Pratapgad : न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमा कोहली आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने या वादाची दखल घेतली आहे.
pratapgad fort Afzal Khan's grave
pratapgad fort Afzal Khan's grave sarkarnama

Pratapgad :प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरी जवळचे अनधिकृत बांधकाम काल (गुरुवारी)पाडण्यात आली. त्यानंतर बांधकामावरील कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे देशाचे लक्ष आहे. राज्य सरकार सुप्रीम कोर्टाकडे एक ते दोन आठवड्यांचा वेळ मागण्याची शक्यता आहे. (pratapgad dispute over afzal khans grave supreme court news update)

अफझल खान स्मारक समितीच्यावतीने अ‍ॅड.निजाम पाशा यांनी सुप्रीम कोर्टात गुरूवारी याचिका दाखल केली आहे. काल घटनापीठासमोर प्रकरण आले असले तरी घटनापीठाने शुक्रवारी सुनावनी करू असे सांगितले होते.

अफझल खानाची कबरीला नुकसान होऊ नये, कबरीवरील छत आणि बांधकाम पाडू नये, असे मोहम्मद अफझल खान मेमोरियलने सुप्रीम कोर्टाकडे दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमा कोहली आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने या वादाची दखल घेतली आहे. यावर दुपारी सुनावणी होणार आहे.

प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई गुरुवारी करण्यात आली. महसूल विभाग आणि वनविभागाने काल पहाटे 4 वाजेपासूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सुमारे 1500 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे बांधकाम हटवण्यात येत आहे. विशेष म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 लाच सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. या दिनाचे औचित्य साधतच राज्य सरकारने ही कारवाई सुरु केली आहे.

pratapgad fort Afzal Khan's grave
Ajit Pawar नाराज आहेत का ? ; मावळातील कार्यक्रमात अजितदादांचे स्पष्टीकरण..

याचिकेत काय आहे ?

  1. याचिकाकर्त्यांनं राज्य सरकारच्या कारवाईवर आक्षेप घेतला आहे.

  2. चुकीच्या पद्धतीने बांधकाम पाडले गेलंय.

  3. अफझल खानाच्या कबरीला धक्का लागू नये

  4. कबरीवरचे छत आणि आसपासचे बांधकाम पाडू नये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in