किरीट सोमय्यांचा प्रताप सरनाईकांना इशारा, व्याजासकट पैसे भरावेच लागतील, अन्यथा...

2012 मध्ये प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे बांधकाम तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.
Kirit Somaiya Warns Pratap Sarnaik
Kirit Somaiya Warns Pratap SarnaikSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी 2008 मध्ये ठाण्यातील पोखरण रोडवर छाबय्या विहंग गार्डन उभारले होते. मात्र ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. त्यानंतर या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने हा दंड माफ केला. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीच्या दंड माफ प्रकरणावरुन आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Kirit Somaiya Warns Pratap Sarnaik)

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. याचवेळी त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायायलयात जाणार असल्याचा इशाराही दिला आहे. "मुख्यमंत्री राज्यातील जनतेची फसवणूक करत आहेत. 2012 मध्ये प्रताप सरनाईक यांचे बांधकाम तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. ठाकरे सरकारने हिरानंदानी बिल्डरचे पण 40 कोटी माफ केले केल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. (Kirit Somaiya News)

Kirit Somaiya Warns Pratap Sarnaik
आमदार नितेश राणे पहिल्यांदाच पोलिसांसमोर हजर; पाऊण तास कसून चौकशी

कोरोना महामारी काळात कोणत्या कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, त्यात कोणी-कोणी किती कमावले हे जनतेच्या समोर यायला हवे. पण त्यांच्यात हिंमत नाही, हे काम आता आपण करणार आहोत, आपण माफिया सेनेला धडा शिकवणार, असल्यांच म्हणत त्यांनी शिवसेनेला इशाराच दिला आहे. त्याचबरोबर, नोट्सप्रमाणे सहा महिन्यांच्या आत सरनाईकांना 18 कोटी 10 लाख भरावे लागणार आहेत. यासाठीही मी उच्च न्यायालयात जाणार आहे, है पैसे व्याजसह सरनाईकांना भरावेच लागतील, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक यांच्या या कंपनाचे बांधकाम अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीन कोटी 33 लाख दंड ठोठावला होता. त्यापैकी कंपनीने 25 लाखांची दंडाची रक्कम महापालिकेकडे जमा केली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील 18 टक्के दराने व्याजाची एक कोटी 25 लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून महापालिकेला येणे बाकी होते. मात्र किरीट सोमय्या यांनी एकूण 21 कोटी रक्कम होत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच, यावेळी त्यांनी प्रताप सरनाईकांनी राज्यपालांना लिहीलेल्या पत्रावरही भाष्य केलं आहे. 'ही नौटंकी आहे. गेली 20 वर्षे हा मुद्दा मांडत आहेत. अशा धमक्यांना किरीट सोमय्या घाबरत नाही. 20 वर्षांपासून एकच वाक्य..जर आम्ही काही केले असेल तर करा कारवाई. पण अशा नौटंकी करून दंड माफ होईल असेल असे त्यांना वाटत असेल तर ते तसे होणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com