Prasad Lad : 'शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला' ; भाजप आमदाराचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य!

Prasad Lad : रायगडावरती राजांचं बालपण गेलं. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्याची सुरूवात कोकणातून झाली.
Prasad Lad
Prasad LadSarkarnama

मुंबई : भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देत, अजब वक्तव्य केले आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे अजब वक्तव्य लाड यांनी कले आहे. मुंबईत भाजपने आयोजित केलेल्या कोकण महोत्सवात पत्रकार परिषेदेत त्यांनी, असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लाड यांचा हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय.

लाड म्हणाले, हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. आणि संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे स्वराज्याची सुरूवात कोकणातून झाली, यामुळे आता लाड यांच्यावर राष्ट्रवादीकडून बरसून टीका करण्यात येत आहे.

यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडण्याची आणि अपमान करण्याची सुपारी घेतली का? असा सवाल मिटकरींनी विचारला आहे. पुन्हा एकदा इतिहासाशी छेडछाड झाली, असं ट्विट मिटकरींनी केली आहे.

Prasad Lad
Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या पत्राचं राष्ट्रपतींकडून दखल, राज्यपालांना हटवणार?

मिटकरी ट्विट करत म्हणाले, भाजपचे आमदार श्री प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. "छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले" .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?

यासोबतच त्यांनी आणखी एक ट्विट करत लाड यांना पुस्तक पाठवले आहे. "प्रसाद लाडांच्या अभ्यासात भर पडावी याकरिता चौथीच्या इतिहासाचे हे पुस्तक त्यांना माझ्याकडून पाठवीत आहे, असे मिटकरी म्हणाले.

Prasad Lad
Pimpri-Chinchwad News : राज्यपालांच्या विरोधात सर्व संघटना एकवटल्या; थेट पिंपरी-चिंचवड बंद ठेवणार

दरम्यान भाजप नेत्यांकडून शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य चुकीची माहिती पसरवण्याचे प्रकार सुरू आहेत का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यपालांकडून झालेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवाजीमहाराजाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यापाठोपाठ भाजपचे नेते व मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते, आता भाजप आमदार लाड यांनी ही चुकीची माहिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com