Tata-Airbus project : फाईल कशा फिरल्या, योग्य वेळी पुरावे देऊ ; भाजपचा देसाईंना इशारा

Tata-Airbus project : "मातोश्री'ला किती टक्के पोहोचायचं हे देसाई यांच्याकडून सांगितलं जात होतं,"
BJP MLA Prasad lad, CM Uddhav Thackeray
BJP MLA Prasad lad, CM Uddhav Thackeray Sarkarnama

Prasad Lad : ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा, हा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असफल ठरला असून, त्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. (Tata-Airbus project news update)

गुजरातला गेलेल्या या प्रकल्पामुळे राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले होते.यावर माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्याला भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यांनी आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

प्रसाद लाड म्हणाले, "लोकांची दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केलं जात आहे.वर्षभरापूर्वी टाटाचा प्रकल्प गुजरात मध्ये गेला होता.सुभाष देसाई येणाऱ्या प्रत्येक उद्योजकांकडे किती टक्के मागत होते हे त्यांनी आधी सांगावं. टक्केवारीसाठी दुबईमध्ये कशा बैठका घेत होते हे त्यांनी आधी सांगावं. मातोश्रीला किती टक्के पोहोचायचं हे देसाई यांच्याकडून सांगितलं जात होतं,"

"किती पैसे घेतले कशा पद्धतीने फाईल फिरल्या याची सर्व जंत्री आमच्याकडे आहे आम्ही ते योग्य वेळी बाहेर काढू. आम्ही पुराव्याशिवाय कधीही बोलत नाहीत आमच्याकडे आतापर्यंत अनेक गोष्टीचे पुरावे होते, नवाब मलिक प्रकरणातील अनिल देशमुख यांचा प्रकरण असेल तर आम्ही ते तडीस नेलं हे देखील योग्य वेळी नेऊ," असे इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे."आम्हाला तोंड उघडायला लावू नका," असे देसाईंना उद्देशून लाड म्हणाले.

BJP MLA Prasad lad, CM Uddhav Thackeray
Aaditya Thackeray : चार प्रकल्प महाराष्ट्रातून गेले, आता तरी उदय सामंत राजीनामा देणार का ?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांनी हा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, हा प्रकल्पही गुजरातला गेल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. ठाकरे गटातील नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्वट करीत उद्योगमंत्र्यांवर टीका केली आहे.

"खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com