Prasad Lad | Pravin Darekar | Devendra Fadnavis
Prasad Lad | Pravin Darekar | Devendra Fadnavis Sarkarnama

लाड, दरेकरांसाठी देवेंद्र फडणवीस गुरुस्थानी; गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले आशीर्वाद

Prasad Lad | Pravin Darekar : असंख्य आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु

मुंबई : आज (बुधवार) गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जण आपल्या गुरुंची भेट घेवून त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. यात राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. आज माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपले राजकीय गुरु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. भेटीदरम्यान दोघांनीही शाल, श्रीफळ, हार घालून सत्कार करत पाया पडून फडणवीसांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार रवि राणा, परिणय फुके देखील उपस्थित होते.

आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधान परिषद आमदारकीच्या पहिल्या कार्य काळात, तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामांचा कार्य अहवाल, "कार्य संचित" चे यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रसाद लाड यांच्या 'मी मुंबई अभियान, अभिमान प्रतिष्ठान'च्या माध्यमातून 'चालता फिरता दवाखाना' उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मागील ३ महिन्यांमध्ये दक्षिण मध्य मुंबईत १०० पेक्षा अधिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, ६००० पेक्षा अधिक गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. याविषयीची माहिती सादर करणारे पत्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले.

गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरूपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. याबाबत ट्विट करुन त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, गुरूपौर्णिमेनिमित्त आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 'शक्ती स्थळ' या समाधीस्थळी उपस्थित राहून विनम्रतापूर्वक अभिवादन केले.

दरम्यान आजच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि आपल्या राजकीय गुरूंपुढे नतमस्तक झाले. त्यानंतर मातोश्री गाठत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई यांचीही भेट घेत खैरेंनी त्यांनाही गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com