Devendra Fadnavis On Ambedkar : आंबेडकरांचा 'मविआ'वरुन ठाकरेंना मोलाचा सल्ला; फडणवीस म्हणाले,''बाळासाहेब कधी कधी..''

Mahavikas Aaghadi News : '' हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं...''
Devendra Fadnavis On Prakash Ambedkar
Devendra Fadnavis On Prakash AmbedkarSarkarnama

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीवरून अलर्ट केलं आहे. यावेळी त्यांनी आमच्या राजकीय मित्रांना आम्ही सांगतो की, पावलं ताबडतोब उचलली तर वाचू शकता असा सल्ला दिला आहे. यावर आता आघाडीसह राजकीय वर्तुळातुन उलटसुलट प्रतिकिया उमटत आहे.आंबेडकरांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोजक्या शब्दांत हा विषय निकाली काढला आहे.

नाना पटोलें(Nana Patole)नी प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर भाष्य केलं आहे. त्यावर पटोले पटोले म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेथील नेत्यांशी चर्चा करून स्वतंत्र लढणार, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल आम्ही भूमिका मांडली नाही. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा करणं योग्य नाही.”

Devendra Fadnavis On Prakash Ambedkar
Mumbai News : फडणवीसांची मोठी घोषणा ; झोपडपट्टीधारकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, अडीच लाखात..

शरद पवार काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरेंनी ताबडतोब निर्णय घेतला तर त्यांच्या पक्षाला अधिक चांगलं असेल. मी त्यांना सावध राहा अशी सूचना केली आहे असं म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकरांना उत्तर द्यायचं काही कारण नाही, त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे असंही मत पवार यांनी व्यक्त केलं.

ते कधी कधी चांगला सल्ला देतात...

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर महत्वपूर्ण टिप्पणी करताना ठाकरेंना टोलाही लगावला आहे. फडणवीस म्हणाले, बाळासाहेब कधी कधी चांगला सल्ला देतात असं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis On Prakash Ambedkar
Nana Patole News : हिम्मत असेल तर निवडणुका घ्या; पाला-पाचोळ्यासारखे कोण उडते ते कळेलच : पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते ?

“नाना पटोले इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे हवा कधी गरम, कधी नरम अशी वक्तव्य ते करतात. नागपुरात त्यांनी म्हटलं, काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार. महाविकास आघाडीत बसलं की म्हणतात आम्ही एकत्र लढणार. त्यामुळे हा फसवण्याचा जो भाग आहे, त्याचं टार्गेट कोण आहे, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं”, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.

...मग त्या पक्षाचं काय राहील?

'एका बाजूला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आम्ही एकटे जाणार, असं म्हणत आहेत. दुसरीकडे एनसीपीमधले सगळे नेते गळाला अडकले आहेत. गळाला अडकलेले मासे तिहारमध्ये जाण्यापेक्षा आम्ही तुमच्याकडेच येतो, मग त्या पक्षाचं काय राहिल? तिसरा आपला मित्र शिवसेना, त्यांच्याकडून तिघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालला आहे. आमच्या राजकीय मित्रांना आम्ही सांगतो की पावलं ताबडतोब उचलली तर वाचू शकता', असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com