गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

Prakash Ambedkar| Nupur Sharma case| प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आज मोर्चा काढणार होती
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News

मुंबई : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) मुंबईत 17 जूनला होणारा अमन मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्णय घेतला. (Prakash Ambedkar News)

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होणाऱ्या या मोर्चात प्रकाश आंबेडकर यांनी सर्व मुंबईकरांना मोठ्या संख्येत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. या मोर्चात नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली जाणार होती. पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आजचा अमन मोर्चा स्थगित केल्याचं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं.

Prakash Ambedkar News
भाजपला एकच गोष्ट विजय मिळवून देऊ शकते! नेत्यांचा जोर त्यावरच...

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शिवगिरी या शासकीय निवासस्थानी प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या नुपुर शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये वंचितकडून आजच्या 'अमन रॅली' संदर्भातही चर्चा झाली. पण या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी अमन रॅली स्थगित करण्याची घोषणा केली.

दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे. नुपूर शर्मांवर कारवाई करण्यासाठी कायदा पारित करावा. नुपूर शर्मा यांच्याविरोधात कारवाई करण्याबाबत दुसरी मागणी केली. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शर्मांवर कारवाईचे आश्वासन दिले. पोलिसांकडून कार्यवाही ची प्रक्रिया सुरु असून लवकरच अटक करण्याचे आश्वासन मिळाले आहे. संजय पांडे निवृत्ती आधी कारवाई करतील, असा विश्वास आहे", अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com