Prakash Ambedkar News : काँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, असं आंबेडकर का म्हणाले..

Prakash Ambedkar News : शिंदे-आंबेडकर यांच्या भेटीत काय चर्चा झाली..
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Prakash Ambedkar News : "सध्या आपण उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यासोबतच आहोत," असेही वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि शिंदे गट व भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आज पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रकाश आंबेडकर बुधवारी दिल्लीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून फोन आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांनी सांयकाळी भेट घेतली. भेटीत विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्याशी अडीच तास चर्चा केली असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

शिंदे-आंबेडकर यांच्या भेटीत काय चर्चा झाली, यांची उत्सुकता अनेकांना होती. याबाबत आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. कालची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेतची भेट ही इंदू मिलबाबत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

सेनेसोबत समझोता करण्यासाठी तयार

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे.भाजपसोबत सध्या निवडणुका लढणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला आहे. भाजपसोबत गेलो असतो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खिमा केला असता, पण आम्ही तसे केले नाही. काँग्रेस आणि शरद पवारांना मी चांगला ओळखतो, सेनेसोबत समझोता करण्यासाठी मी तयार आहे, एकत्र लढण्याबाबत ठाकरेंकडून जाहीर करणं बाकी आहे,"

"आम्ही मागील ३५ वर्षांपासून राजकारणात आहोत. आमचे राष्ट्रवादी, काँग्रेसमुळे नुकसान झाले. मात्र, तरीदेखील आम्ही भाजपासोबत गेलो नाहीत," असे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले..

  • भाजप आणि आरएसएसबरोबर वंचित बहुजन आघाडी कधीही जाणार नाही. त्यांच्यासोबत व्यवस्थेचं भांडण आहे.

  • भाजपसोबत कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार हे स्पष्ट आहे.

  • एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास आम्ही त्यांच्यासोबत युतीचा विचार करू,

  • एकनाथ शिंदे हे खानदानी आहेत. एकनाथ शिंदे जुने शिवसैनिक आहेत. ते 70च्या काळातील शिवसैनिक आहेत.

  • पँथर आणि शिवसेना यांचं नातं त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं माहीत आहे.

  • पँथर आणि आनंद दिघेंचे संबंध नव्या पिढीला माहीत नाही. पँथर आणि दिघेंचे संबंध खूप चांगले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com