Prakash Ambedkar News : आंबेडकर म्हणाले, "माझ्याइतके शरद पवारांना कोणीच ओळखत नाही...

Prakash Ambedkar News : आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
Sharad Pawar, Prakash Ambedkar
Sharad Pawar, Prakash Ambedkar sarkarnama

Prakash Ambedkar News : वंचित बहुजन विकास आघाडी ठाकरे की शिंदे गटासोबत जाणार याची चर्चा सध्या सुरु आहे. 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण ठाकरेंनी अद्याप यावर स्पष्टपणे युतीची घोषणा केलेली नाही.

बुधवारी आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे ते शिंदे गटाशी युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन आज स्पष्टीकरण दिले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आमची युती झाली आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याचा अद्याप जाहीर खुलासा झालेला नाही,युतीबाबत केवळ घोषणा बाकी आहे, असे आंबेडकरांनी सांगितले. यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News : काँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, असं आंबेडकर का म्हणाले..

आंबेडकर म्हणाले, "भाजपसोबत युती करणे आमच्या नैतिकतेत बसत नाही.विरोधकाचा विरोधक आपला मित्र,अशी भूमिका याबाबतीत आम्ही कधीही घेणार नाही. विचारधारेशी तडजोड होऊ शकत नाही. जी व्यवस्था आम्ही उद्धवस्त केली, ज्या व्यवस्थेत बदल घडवून आणला तीच व्यवस्था भाजप आणि आरएसएस पुन्हा आणू इच्छित आहे. भाजप,राष्ट्रीय स्वंयसेवक संघासोबत आमचे वैचारिक भांडण आहे,"

Sharad Pawar, Prakash Ambedkar
Punjab Politics : मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलयं ; एका मंत्र्याचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

​​​प्रकाश आंबेडकर म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मी चांगलेच ओळखतो. शरद पवार यांना महाराष्ट्रात कोणी एवढे ओळखत नसेल तेवढा मी ओळखतो. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यास या दोन पक्षांकडूनच का-कू केली जात आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे की, हे दोन्ही पक्ष तुम्हाला फसवतील. त्यामुळे आमच्यासोबत युती करण्याबाबत आता उद्धव ठाकरेंनी आणखी थांबू नये,"

"माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे.भाजपसोबत सध्या निवडणुका लढणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला आहे. भाजपसोबत गेलो असतो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खिमा केला असता, पण आम्ही तसे केले नाही," असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com