Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी वाढवलं शिंदे-फडणवीसांचं टेंशन, म्हणाले...

Prakash Ambedkar : "भांडत बसायचं की, चौघे एकत्र यायचं ते ठरवा.."
Prakash Ambedkar | Ekanath Shinde | Devendra Fadnavis
Prakash Ambedkar | Ekanath Shinde | Devendra FadnavisSarkarnama

Prakash Ambedkar : '२०२४ च्या विधानसभा निवडणुका शिवसेना आणि वंचित एकत्र येऊन लढवल्यास 150 जागा सहज येतील आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत एकत्रित येऊन लढवल्यास २०० जागा आरामात जिंकणार, सी व्होटरचा सर्व्हेही हेच सुचवत आहे. यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवायचं आहे, चौघांनी एकत्रित यायचं की भांडण करत बसायचं, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Prakash Ambedkar | Ekanath Shinde | Devendra Fadnavis
Bharat Jodo Yatra : यात्रेतून पोलीस गायब; राहुल गांधींनी थांबवलेली पदयात्रा पुन्हा सुरु; नक्की काय झाले होते?

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीमधील अंतर्गत नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासोबत असलेले मतभेद आपण केव्हाच सोडून दिले आहेत. यामुळे मविआसोबत जाताना माझ्या मनात किंतु परंतु काही नाहीच. शिवसेनेसोबत जातानाही आम्ही ठरवलंय की, एकमेकांच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करायची नाही. टीका टाळायची. त्यामुळे इतर नेत्यांनीही याबाबत तारतम्य बाळगावं. असंही आंबेडकर म्हणाले.

नुकतीच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट युतीची घोषणा जाहीर करण्यात आली . मात्र राजकीय समीकरणानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस असल्याचे बातम्या आले होते. यावरून प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही काही राजकीय टीका टिप्पणी झाली.

Prakash Ambedkar | Ekanath Shinde | Devendra Fadnavis
BJP Taunt Uddhav Thackeray : भाजपचा ठाकरेंना टोमणा; आता कुणाची बाजू घेणार, पवार की आंबेडकरांची..?

आता वंचितबाबत महाविकास आघाडीची काय भूमिका असणार आहे, यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. यापुढेही सर्व निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितच लढवव्यात, अशी आमची भूमिका आहे. जागा वाटपाबाबत कसली चर्चा किंवा अजून काहीही ठरलेलं नाही. मात्र युतीबाबत वंचित आणि आमची कोणतीही चर्चा झाली नाही, असे पवार यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com