प्राजक्त तनपुरेंनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात केली वाढ

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश काही दिवसांपुर्वी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी महावितरणला दिले.
prajakt tanpure
prajakt tanpureSarkarnama

मुंबई : राज्यातील महावितरणचे ग्राम विद्युत व्यवस्थापक थंडी, उन, वारा, पाऊस या आस्मानी संकटात तुटपुंज्या मानधनावर काम करतात. राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश काही दिवसांपुर्वी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी महावितरणला दिले. Prajakt Tanpure increased the honorarium of village electricity managers

त्यानुसार महावितरण कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेऊन ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ केली. आता ग्राम विद्युत व्यवस्थापकांना प्रतिमाह 5 हजार रुपये मानधन मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील 500 हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले.

prajakt tanpure
मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तरूणांना दिली ही आनंदाची बातमी...

प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून महाराष्ट राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या कार्यालयामध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली व मागण्यांचा गांभीर्यपुर्वक विचार करुन मानधनात वाढ केली, त्याबद्दल ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी आभार व्यक्त केले आहे.

3 हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरण कंपनीकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रान्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमाह 3 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ग्राम विद्युत व्यवस्थापक यांची मुंबई येथे संयुक्त बैठक घेवून मानधनात वाढ करण्याचे निर्देश महावितरण कंपनीला दिले. त्यानंतर महावितरण कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेऊन विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात 2 हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवार (ता. 26) पासून ही वाढ लागू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com