विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव बिनविरोध; संजय केणेकरांची माघार

काँग्रेसचे (Congress) नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची ही पोटनिवडणूक (Legislative Council by-election) होत आहे.
विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव बिनविरोध; संजय केणेकरांची माघार

मुंबई : दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. संजय केणेकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विनंती केल्यानंतर अखेर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची सूत्रांनी माहिती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची ही पोटनिवडणूक होत आहे.

विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव बिनविरोध; संजय केणेकरांची माघार
सोनिया आणि राहुल गांधींनी प्रज्ञा सातव यांना दिलेला शब्द पाळला

दरम्यान, काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली. प्रज्ञा सातव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. राजीव सातव हे काँग्रेसचे युवक नेते होते. त्यांचा सर्वांशी जवळचा परिचय होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले होते. त्यानुसार त्यांनी आणि बाळासाहेब थोरात यांंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सहमती दर्शवली.

राज्यसभेचे खासदार राहिलेले राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना सक्रीय राजकारणात उतरवण्याची काँग्रेसने भूमिका घेतली. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना या जागी संधी दिली पाहिजे, असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे होते. राजीव सातव यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेसाठी संधी द्यावी, असे कॉग्रेसमधील अनेकांची इच्छा होती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in