एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला तळोजा तुरुंगात का वाटते भीती?

तळोजा तुरुंगामध्ये माझ्या जीवाला धोका आहे
Pradeep Sharma
Pradeep SharmaSarkarnama

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याने तळोजा तुरुंगातून ठाणे तुरुंगात पाठविण्याची मागणी विशेष न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. तळोजा तुरुंगामध्ये माझ्या जीवाला धोका आहे, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. (Pradip Sharma demands to be sent to Thane jail)

अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात शर्मा प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा एनआयएने केला आहे. शर्माला पोलिसांनी जूनमध्ये अटक केली आहे. पोलिस अधिकारी म्हणून सेवेत असताना त्याने अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे, त्यातील अनेकांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. आता यातील काही गुन्हेगार तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. मला ठाणे तुरुंगात स्थलांतरित करावे, असे शर्माने अर्जात म्हटले आहे. याचबरोबर तुरुंगात घरचे जेवण मिळावे, अशी मागणीही केली आहे.

Pradeep Sharma
आमच्या लहानपणी भाऊसाहेबांचा मोठा दरारा असायचा; कुणाचीही जमीन कुणाच्याही नावावर करायचे!

या अर्जावर विशेष न्या. ए. टी. वानखेडे यांच्यापुढे सुनावणी झाली. जेव्हा शर्माला अटक झाली, तेव्हाही त्याने ही मागणी केली होती. त्या वेळी न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्यापही यावर प्रशासनाने भूमिका मांडली नाही, असे शर्माच्या वतीने ॲड. चंदनसिंह शेखावत यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने यावर प्रशासनाला खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मुंबई महानगर क्षेत्रातील तुरुंगाऐवजी पुणे किंवा अन्य तुरुंगात स्थलांतर करण्याचा विचार करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर घरचे जेवण देण्याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपी संतोष शेलार, आनंद जाधव यांच्या जबाबानंतर शर्माला अटक केली आहे.

Pradeep Sharma
गुटखा खाणाऱ्यांची अजितदादांनी धारिवालांसमोरच चंपी केली....

दरम्यान, या प्रकरणात सीमकार्ड पुरविणाऱ्या आरोपी नरेश गौरनेही जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. निलंबित पोलिस सचिन वाझे याने माझा वापर केला. माझा या प्रकरणाशी संबंध नाही, असा आरोप त्याने केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास स्थानाबाहेर स्फोटक असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या कारचा ताबा ठाण्यातील व्यावसायिक हिरेनकडे होता. मात्र, त्याचा मृतदेह मार्चमध्ये ठाणे खाडीत सापडला होता. वाझेसह यामध्ये अन्य काही पोलिस अटकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com