वानखेडेंना अडचणीत आणणाऱ्या प्रभाकर साईलचा आणखी एक गौप्यस्फोट

समीर वानखेडेंना अडचणीत आणणारे पंच प्रभाकर साईल यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.
Prabhakar Sail
Prabhakar Sail

मुंबई : क्रूझ पार्टीप्रकरणी (Cruise Party) अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडेंना (Sameer Wankhede) अडचणीत आणणारे पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. कोणत्याही नेत्याशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, साईल यांच्या जिवाला धोका असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे.

प्रभाकर साईल हे क्रूज पार्टी प्रकरणात पंच आहेत. या प्रकरणातील पंच के.पी, गोसावींचा सुरक्षा रक्षक म्हणून काम म्हणून साईल काम करीत होते.त्यांनी केलेल्या आरोपांमुळे एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ते म्हणाले की, के.पी.गोसावी याने मला पैसे ट्रान्सफर केले नव्हते. त्याने मला हाजी अली येथे जाऊन तेथून पैसे घेण्यास सांगितले होते. माझे एकाही नेत्याशी संबंध नाहीत. माझ्या विरोधाता आतापर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. आता मी एमआरए पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जात आहे.

Prabhakar Sail
दिल्लीत दाखल होताच वानखेडेंनी केला वेगळाच दावा

साईल यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जिवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा त्यांनी केला होता.

Prabhakar Sail
वानखेडेंची चौकशी अद्याप नाहीच! एनसीबीच्या उपमहासंचालकांचा गौप्यस्फोट

क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईल यांनी काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर गोसावी हे आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते. साईल यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. याचबरोबर त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com