प्रभाकर देशमुख यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर निवड

श्री. देशमुख यांना प्रशासनातील मोठा अनुभव असून त्यांनी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, सचिव, विभागीय आयुक्त आदी पदांवर प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनातील उत्कृष्ट कामाबद्दल दोनवेळा पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कृषी आयुक्त असताना दुष्काळाचा यशस्वीपणे सामना करण्यात यश मिळवले होते.
Prabhakar Deshmukh elected as a member of State Disaster Management Authority
Prabhakar Deshmukh elected as a member of State Disaster Management Authority

दहिवडी : महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (Disaster Management Authority) सदस्यपदी माजी विभागीय आयुक्त तथा माण तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्र्यांच्या उपाध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समितीत प्रभाकर देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. श्री. देशमुख यांना प्रशासनातील मोठा अनुभव असून त्यांनी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, सचिव, विभागीय आयुक्त आदी पदांवर प्रभावीपणे काम केले आहे. (Prabhakar Deshmukh elected as a member of State Disaster Management Authority)

विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारा, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन आदीबाबी व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मध्ये अंमलात आणला आहे. यामध्ये इतर बाबींसह राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावीपणे व्हावे आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन सदस्यांचा अंतर्भाव करून प्राधिकरणाच्या रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्र्यांच्या उपाध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समितीत प्रभाकर देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे.

श्री. देशमुख यांना प्रशासनातील मोठा अनुभव असून त्यांनी  प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, सचिव, विभागीय आयुक्त आदी पदांवर प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनातील उत्कृष्ट कामाबद्दल दोनवेळा पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कृषी आयुक्त असताना दुष्काळाचा यशस्वीपणे सामना करण्यात यश मिळवले होते. तसेच कोकणातील वादळातही परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळली होती. त्यांच्या या अनुभवाचा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला नक्कीच फायदा होईल.

 "आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. परिस्थिती पाहून तत्काळ निर्णय घेताना जनतेच्या जीवीताची व संपत्तीची हानी होवू नये यासाठी प्रयत्न करणे तसेच तशी परिस्थिती ओढवल्यास त्वरित मदत करण्याची आवश्यकता असते. यासाठी या प्राधिकरणाच्या माध्यमातून लोकोपयोगी धोरणात्मक निर्णय घेणे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी मी प्रयत्न करेन." 
 

- प्रभाकर देशमुख (माजी विभागीय आयुक्त व राष्ट्रवादीचे नेते)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com