Lahuji Raghoji Salve: वस्ताद लहूजी साळवे यांच्या नावाने डाक तिकीट प्रकाशित करावे ; भाजप आमदाराची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहुजींचे वडील राघोजी यांना स्वराज्याचा बुलंदगड असणाऱ्या पुरंदर या गडकिल्याची रखवाली दिली होती.
Wastad Lahooji Salwe
Wastad Lahooji Salwe

Mumbai News : आद्यक्रांतिवीर वस्ताद लहूजी साळवे (जन्म १४ नोव्हें १७९४ मृत्यू १७ फेब्रु १८८१) यांच्या नावे डाक तिकीट प्रकाशित करण्यासाठी केंद्र सरकार यांना तातडीने प्रस्ताव सादर करा, अशी मागणी आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत केली आहे.

एकेकाळी आपल्या भारत देशाला स्वातंत्र मिळवून देणाऱ्या ज्या ज्या म्हणून काही चळवळी सुरू झाल्या, त्यामधील एक अग्रगण्य चळवळ म्हणजे आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांच्या सशस्त्र आंदोलनाची चळवळ होय. त्यांचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १७९४ मध्ये पुरंदर किल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पेठ या गावात झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहुजींचे वडील राघोजी यांना स्वराज्याचा बुलंदगड असणाऱ्या पुरंदर या गडकिल्याची रखवाली दिली होती.

Wastad Lahooji Salwe
Heeraben Modi Death : पंतप्रधानांनी घेतलं आईच्या पार्थिवाचं दर्शन, थोड्याचवेळात होणार अंत्यसंस्कार

राघोजी यांच्या अंगचे कर्तृत्व पाहून महाराजांनी त्यांना “राऊत” ही पदवी दिली होती. वडीलांच्या कतृत्वाचा वसा आणि वारसा सांभाळणाऱ्या लहुजींनी पुढे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीला मोठे योगदान दिले. त्यासाठी शेकडो तरुणांच्या प्रशिक्षित फौजा फक्त ते निर्माण करूनच थांबलेले नाहीत, तर “जगेण तर देशासाठी, आणि मरेण तर देशासाठी!" अशी घोषणा केली. आपल्या कार्याने त्यांनी सामाजिक सुधारणेची मोठे पर्व उभा केले. या पर्वासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य पणाला लावले.

लहूजी वस्ताद यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी खंबीरपणे साथ देऊन त्यांच्या सत्यशोधकिय विचारांची परंपरा भारतातील तमाम तरुणांच्या पुढे शैक्षणिक आणि वैचारीक क्रांतीसाठी ठेवली. हा भारतदेश स्वतंत्र व्हावा, या देशातील लोकांना स्वातंत्र बंधुता लाभावी, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे व्यवहार करुन देशाची क्रिर्ती प्रत्येकाने उज्वल करावी, अशी स्वप्ने पाहून त्या स्वप्नासाठी आपले बलीदान देणाऱ्या समाजसुधारक आद्यक्रांतीवीर लहूजी साळवे यांचा मृत्यू १७ फेब्रुवारी १८८१ रोजी झाला आहे.

अशा या भारत भूमीच्या सुपूत्राचा १४२ वा स्मृतीदिन १७ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असल्यामुळे भारत सरकारने त्यांचे स्वातंत्र लढ्यातील आणि समाजसुधारणेच्या कार्यातील योगदानाचा गौरव व्हावा याकरिता त्यांच्या नावे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्ताने “डाक तिकीट" प्रकाशीत करण्याविषयी केंद्र सरकारला आपण प्रस्ताव सादर करावा अशी आग्रही मागणी आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभा सभागृहांमध्ये औचित्याचा मुद्दा याद्वारे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in