अमित शहा - राज ठाकरे भेटीची शक्यता : भाजप मनसे युतीचे संकेत

Amit Shaha News : मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप - मनसे अशा नव्या राजकीय समीकरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Raj Thackeray & Amit Shaha
Raj Thackeray & Amit ShahaSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येत आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यानच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शाह यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह (Amit Shah) हे लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली होती. या लगोलग भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप - मनसे अशा नव्या राजकीय समीकरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Raj Thackeray & Amit Shaha
महाराष्ट्रातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन माजी मंत्री शिंदे सरकारमध्ये पुन्हा होणार मंत्री

एकीकडे राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थ येथे गणपतीचं दर्शन घेतले. शिवसेना आणि भाजपमधील युती संपुष्टात आल्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दा आक्रमकपणे पक्षाच्या अजेंड्यात रोवला. पक्षाचा झेंडा बदलून 'संपूर्ण भगवा' केला. एकनाथ शिंदे गटासोबत भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपमध्ये राजकीय सूत जुळताना दिसत आहे. मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Raj Thackeray & Amit Shaha
Nitin Gadkari : पुण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरु होणार..

मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. मनसे आणि भाजप असे राजकीय समीकरण जुळून आल्यास हिंदुत्वादी मते युतीच्या बाजूने एकत्रित होऊन त्यामुळे भाजपला मुंबईत फायदा होईल तर शिवसेनेला याचा जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com