Chitra Wagh Vs Urfi Javed : राजकारण तापलं! उर्फीच्या तक्रारीनंतर महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना आदेश

राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्याला मारहाणीच्या धमक्या देत असल्याची तक्रार उर्फीने केली आहे.
Chitra Wagh- Urfi Javed
Chitra Wagh- Urfi Javed

Urfi Javed - Chitra Wagh Controversy : तोकड्या कपड्यांवरून चर्चेत आलेल्या उर्फी जावेदने (Urfi Javed) महिला आयोगाकडे (Women Commission) आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्याला मारहाणीच्या धमक्या देत आहेत. माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी तक्रार उर्फीने आयोगाकडे केली आहे. तसेच आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणीही उर्फीने आयोगाकडे केली आहे.

महिला आयोगानेदेखील उर्फीच्या तक्रारीची त्वरीत दखल घेतली असून थेट मुंबई पोलिस आयुक्तांनाच पत्र लिहिलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांनी उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुनत्याचा अहवाल महिला आयोगाला सादर करण्यात यावा, असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत.

Chitra Wagh- Urfi Javed
PCMC Politics : पिंपरी महापालिकेला उशिराने जाग, प्रभारी आयुक्तांचा पहिलाच आदेश विलंबाने

काय म्हटलं आहे उर्फीने तक्रारीत?

मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे. मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, अशी मागणी उर्फी जावेदने आयोगाकडे केली आहे.

महिला आयोगाचे आदेश काय ?

राज्यघटनेत प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा हक्क दिला आहे. पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे आदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.

चित्रा वाघांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांना विचारले असता त्यांनीही यावर पुन्हा भाष्य केलं आहे. मी उर्फीला धमकी दिलेली नाही. फक्त तू नागडी फिरू नकोस, असा इशारा दिला आहे. तिच्या व्यवसाय किंवा पेशाविषयी किंवा अंगप्रदर्शनाला आमचा विरोध नाही. तर ती ज्या प्रकारे रस्त्यावर फिरत आहे, त्याला आमचा विरोध आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मी तिला धमकी दिलेली नाही, पण रस्त्यावर नागडं फिरण्याविरोधात धमकी दिली आहे. तिला जी काही फॅशन करायची आहे ती तिने चित्रपटात किंवा तिच्या क्षेत्रात करावी, पण रस्त्यावर फिरताना अशा पद्धतीने फिरू नये, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com