
Onion Crisis : कांदा निर्यात शुल्क वाढीवरून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. पुण्याजवळील आळेफाट्यावर रास्ता रोको करण्यासाठी शेतकरी एकवटल्यानंतर राज्य सरकारने दिल्ली दरबारी वजन वापरत या प्रश्नी तोडगा काढला आहे. थेट जपानमधून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना फोन केला.
कांदा निर्यात शुल्कबाबत दोन्ही मंत्र्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे गोयल यांची भेट घेण्यापूर्वीच फडणवीस यांची ट्विट करून माहिती दिली. त्यामुळे कांद्यावरून सरकारमधील राष्ट्रवादी-भाजपमध्ये वांदा झाल्याचे पुढे आले आहे. याचे श्रेय घेण्यावरून राष्ट्रवादी-भाजप दोन्ही पक्षात राजकारण चांगेलच तापले आहे.
कांदा निर्यात शुल्क वाढीवरून पुण्याजवळील आळेफाट्यावर रास्ता रोको करण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्यासह शेतकरी एकवटले होते. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, हमीभाव द्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली. निर्यात शुल्कवाढ मागे घेईपर्यंत, राज्यात येणाऱ्या प्रत्येकाला कांद्याची माळ घालणार, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा पोटावर पाय दिला जात आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली होती. त्यामुळे राज्य सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागला.
थेट जपानमधून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना फोन केला. कांदा निर्यात शुल्कबाबत दोन्ही मंत्र्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर केंद्र सरकार येत्या काळात दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली. त्यासोबतच दोन हजार ४१० प्रतिक्विंटल दराने ही खरेदी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले
तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून २४१० रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. निर्णय घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार. देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून कॉल केला. कांदा उत्पादक शेतकऱ्याला कुठलीही अडचण येणार नाही. दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.