Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले,"चुकीला माफी नाही, शिक्षा होणारच.."

yakub memon case : मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे.
yakub memon case
yakub memon case sarkarnama

मुंबई : मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी याकूब मेमन कबर शुशोभीकरणाचा (yakub memon case)मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. याकूब मेमन प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. (yakub memon case news update)

याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आली तसचे त्याभोवती लाईटींग आणि कठडा देखील उभारण्यात आला. मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे.

या विरोधात भाजपने शिवसेना, मुंबई महापालिकेवर सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. त्यांनी या विषयावर बोलणे टाळले."पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, जे चुकीचे आहेत त्यांच्यावर कारवाई होईल," असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

yakub memon case
Ganesh Visarjan Live 2022 : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत चर्चा 'या' बॅनरची..

मुंबईच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला (yakub memon)फासावर लटकावून त्याला आता 7 वर्षे झाली आहे. मात्र, कबरीबाबतच्या वादामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. यावरुन नेतेमंडळी आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

यावरून भाजपने महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

‘दफनभूमीवर सुशोभीकरण करणं महापालिकेचं काम असतं. खासगी दफनभूमी असेल तर पालिकेची परवानगी घ्यावी लागते. मग याकूब मेमनच्या कबरेचं सुशोभीकरण सुरू होतं तेव्हा पेंग्विन सेनेची पिलावळ काय करत होती?’ असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे. "पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते," असा टोला शेलारांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com