Police Recruitment : पोलीस भरतीला हिरवा कंदील, 11 हजार 443 पदांची होणार भरती!

Police Recruitment : पोलिसांची रिक्त राहिलेली 100 टक्के पदे भरण्याला आता अखेर मान्यता दिली.
police
policesarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदिल मिळाला आहे. अखेर महाराष्ट्र सरकारकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आले आहे. आता सरकारने हा जीआर काढल्यानंतर तब्बल 11 हजार 443 पोलिसांची पदे भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात पोलिसांची रिक्त राहिलेली 100 टक्के पदे भरण्याला आता अखेर मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागात पोलीस शिपाई या संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई असे एकूण तब्बल 11 हजार 443 पदं भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच,एमपीएससी कक्षेतील पदे वगळून, इतर पदांसाठी 50 टक्के भरण्यास राज्य सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे.

police
गिरणी कामगारांनी पुन्हा वातावरण तापवलं!

पोलीस विभागातील पोलीस शिपाई गट-क या संवर्ग 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण 11 हजार 443 जागा रिक्त झाल्या होत्या. आता जीआरनंतर या रिक्त पदांच्या भरतीला 100 टक्के भरायला मान्यता मिळाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता पोलीस शिपाई संवर्ग पदांची राज्याला गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये कोणतीही नवीन पदांचीनिर्मिती केली नसून, उपलब्ध पदांच्या सिमेत रिक्त पदं भरण्यात यावीत, असंही या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

police
RSS : ‘भारत जोडो’मुळे डॉ. मोहन भागवत यांना मुस्लीम समाजासोबत बोलावे लागले !

गेल्या महिन्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आवरण्यासाठी पोलिसांनासौम्य लाठीमारही करावा लागला होता. अखेर आज पोलिस भरतीला हिरवा कंदील मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com