दुसऱ्या पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार ती महिला कोण? सेना आमदाराकडं पोलिसांची विचारणा

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
Rajani and Mangesh Kudalkar
Rajani and Mangesh Kudalkar Sarkarnama

मुंबई : मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. कुडाळकर यांच्या पत्नी रजनी यांनी आत्महत्येपूर्वी मुलाला पाठवलेला मेसेज समोर आला आहे. यात एका महिलेचा उल्लेख आहे. या प्रकरणी कुडाळकर आणि त्यांच्या मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, संबंधित महिलेबाबत त्यांच्याकडे विचारणा केली आहे. (Rajani Kudalkar Suicide Case Updates)

कुडाळकर आणि रजनी या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. त्यांचा विवाह 2014 मध्ये झाला होता. त्या दोघांनाही पहिल्या विवाहातून दोन अपत्ये आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी रजनी यांनी त्यांच्या पहिला पतीपासूनचा मुलगा हर्षल भाटे याला मेसेज पाठवला होता. यात त्यांनी एका महिलेचा उल्लेख केला होता. या प्रकरणी मंगेश कुडाळकर यांच्यासह हर्षल भाटे यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. रजनी यांनी उल्लेख केलेली ती महिला कोण, याबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली आहे.

Rajani and Mangesh Kudalkar
शिवसेना आमदाराच्या पत्नीच्या आमहत्येचं गूढ वाढलं; मुलाला केलेला मेसेज आला समोर

रजनी कुडाळकर (वय 42) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलाला एक मेसेज केला होता. हा मेसेज पोलिसांनी (Police) मिळाला आहे. यात त्यांनी एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला होता. माझं काही बरंवाईट झाल्यासं ही महिला जबाबदार असेल, असं त्यांनी म्हटलं होत. त्यामुळे ही महिला रजनी यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची शक्यता समोर येत आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामुळं या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.

Rajani and Mangesh Kudalkar
भाजप आमदाराच्या गाडीनं दोघांना चिरडलं अन् ड्रायव्हर काही तासांतच जामिनावर सुटला

मेसेजमधील महिला कोण?

रजनी कुडाळकर यांनी थेट आपल्या मुलाला मेसेज पाठवून उल्लेख केलेली महिला कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या महिलेचा कुडाळकर कुटुंबीयांशी काय संबंध होता, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल रजनी यांना जिच्यामुळं उचलावं लागलं त्या महिलेचा एकूण काय संबंध होता, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

रजनी कुडाळकर यांनी 17 एप्रिलला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रजनी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण उद्याप उघड झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, असं पोलिसांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com