Sandeep Deshpande Attack Update : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

MNS News : ताब्यातील दोघांकडे अधिक चौकशी सुरूच
Sandip Deshpande
Sandip DeshpandeSarkarnama

Mumbai News : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी (ता. ३) दादरच्या शिवाजी पार्क परिसरात चार जणांनी हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Branch) दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ते दोघेही आरोपी हे भांडूपमधील असल्याची माहिती आहे. सध्या पोलीस दोन्ही आरोपींकडे विविध बाजूंनी तापस करीत आहे.

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) आठ पथके तयार केली होती. त्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण केले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दोन जणांना भांडुपमधून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची प्राथमिक कबुली दिली आहे. आता त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

Sandip Deshpande
Chinchwad by-election : चिंचवड जिंकूनही भाजपला चिंता; कारण काय?

यावेळी पोलिसांनी सांगितले की, या हल्ल्यामागील आरोपींचा राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व इतर काय हेतू होता का, त्यामागील सूत्रधार कोण आहे का, याबाबत चौकशी सुरू आहे. त्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर डोंबविली आणि भांडुप परिसरात ३०७ आणि ३२४ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांचे इतर दोन साथिदारांची माहिती मिळाली आहे. त्यांनाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पोलिसांना दिलेल्या जबाबात थेट शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाईंवर (Varun Sardesai) आरोप केला आहे. मुंबई महापालिकेतील घोटाळे उघड करत असल्यानेच सरदेसाईंच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप देशपांडेंनी केला आहे. याबाबत पोलिसांनी त्या दृष्टीनेही ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे तापस सुरू असल्याचे सांगितले.

Sandip Deshpande
Imtiaz Jalil News : मनसे चिल्लर पार्टी, अशा पक्षाबद्दल मी बोलत नाही..

संदीप देशपांडे हे शुक्रवारी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी नागरिकांनी धाव घेतल्याने हल्लेखोरांनी पळ काढला. त्या हल्ल्यात देशपांडेंच्या हात आणि पायाला दुखापत झाली आहे. देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते.

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी काही पथके तैनात केली. त्यांनी शिवाजी पार्क परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त माहितीच्या आधारे दोन हल्लेखोरांना भांडूपमधून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com