भाजपचा मोर्चा पोलिसांनी रोखला; पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकरांना घेतले ताब्यात

भाजपने (BJP) ओबीसी आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला होता.
भाजपचा मोर्चा पोलिसांनी रोखला; पाटील, मुनगंटीवार, दरेकर, पडळकरांना घेतले ताब्यात
BJP Morcha News Today, OBC Reservation Newssarkarnama

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा कार्यालयातच पोलिसांनी रोखला आहे. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह भाजपचे आमदार आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. भाजप कार्यालय ते मंत्रालय असा हा मोर्चा काढण्यात येणार होता.

कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या नेत्यांसह महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिला कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोरच ठिय्या मांडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये नेले जात असून पुढील प्रक्रिया केली जात आहे.

BJP Morcha News Today, OBC Reservation News
फडणवीस, तुम्ही निवडणूक येईपर्यंत आरक्षणासाठी काहीच केले नाही!

महाविकास आघाडीतील नेत्यांनी ओबीसी समाजाला फसवले असल्यामुळे ते आज भाजपच्या कार्यालयात आले आहेत. लोकांना देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्त्व हवे आहे, पवार साहेबांनी लोकांना फसवले, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. महाविकास आघाडीच्या हातात सरकार आहे. त्यांच्या पक्षातले काही लोक रस्त्यावर उतरले आहेत, असे पाटील म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुद्दाम केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात आणत आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याला ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती. मात्र, सरकारने आयोग स्थापन केला नाही, ओबीसींचा सॅम्पल सर्व्हे करणार नाही, आरक्षणाची टक्केवारी ठरवणार नाही. या गोष्टी न करता केंद्राच्या नावाने शिमगा करायचे हे फक्त पवारच करु शकतात, असे पडळकर म्हणाले.

राज्याच्या निवडणूक आयोगाने आरक्षणाची सोडत दिनांक जाहीर केली. 31 मे रोजी सोडत निघणार आहे. मुख्यमंत्री जरी मंत्रालयात गेले नसतील तरी हा मोर्चा मंत्रालयापर्यत जाणार आहे. ये तो एक झाकी है और अभी बाकी है. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या सरकारच्या कानफटात बसली आहे. मध्य प्रदेशमध्ये साडे तीन महिन्यात डेटा तयार होतो तर राज्य सरकार का करत नाही, असा सवाल योगेश टिळेकर यांनी केला.

BJP Morcha News Today, OBC Reservation News
संभाजीराजे : चारही घरचा पाहुणा उपाशी!

महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात केंद्राने काय केले. शिवसेना मंडल आयोगाला विरोध कोला म्हणून भुजबळ यांनी शिवसेना सोडली मग आता राष्ट्रवादी सोडणार आहात का? यांच्याकडे ओबीसींसाठी पैसे नाहीत. पोलिसाना आपण सहकार्य करु शांततेत आम्ही मंत्रालयासमोर जाऊ, असेही टिळेकर म्हणाले होते. राष्ट्रवादीची पिलावळ ओबीसीच्या विरोधात आहे. भाजप ओबीसींना 27 टक्के जागा देणार, जर आमचे आरक्षण पूर्ववत झाले नाही तर आम्ही आणखी आक्रमक होऊ, असा इशाराही टिळेकर यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in