आशिष शेलारांना धमक्या देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती.
आशिष शेलारांना धमक्या देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांना पत्र लिहून तक्रार केली.

या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने काही तासांत मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ओसामाने समशेर खान असं या 48 वर्षीय इसमाचे नाव आहे. पोलिसांनी ओसामाने शेखला अटक केली त्याच्याकडून अदिक चौकशी सुरू आहे.

आशिष शेलारांना धमक्या देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
आशिष शेलारांच्या जीवाला धोका?; कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल आमदार आशिष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शेलारांना दोन वेगवेगळ्या नंबरवरुन सतत धमकीचेय कॉल येत होते. कॉलवरुन शेलारांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती.

या धमकीच्या कॉलबाबत आशिष शेलारांनी आयुक्तांना हेमंत नगराळे यांना पत्राद्वारे तक्रार केली. त्यात दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन तपास करण्याची विनंतीही केली. त्यानंतर अवघ्या २४ तासांत मुंबई पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांना धमकीची पत्रे तर काहींना कॉलवरुन धमकी देण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

दरम्यान आशिष शेलार (Ashish Shelar) यांना यापुर्वी एकदा २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्यापुर्वी अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती सापली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली असून याबाबत शेलार आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in