करणीच्या नावाखाली 28 वर्षीय भोंदूबाबाने महिलेला घातला ३२ लाखांचा गंडा..

नागरिकांकडून लाखो रुपये व दागिने उकळणाऱ्या भोंदूबाबाच्या डोंबिवली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
करणीच्या नावाखाली 28 वर्षीय भोंदूबाबाने महिलेला घातला ३२ लाखांचा गंडा..
Crime NewsSarkarnama

डोंबिवली : जळगाव जिल्ह्यातील गंजेवाडा येथे दरबार भरवत नागरिकांची फसवणूक करत नागरिकाकडून लाखो रुपये व दागिने उकळणाऱ्या तरूण भोंदूबाबाच्या डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी (Ramnagar Police) अखेर मुसक्या आवळल्या आहेत.

Crime News
पालिका आयुक्तांची तक्रार नोंदवायला कृष्णप्रकाश यांच्या पोलिसांना लागले पाच दिवस

कळव्यात राहणाऱ्या एका गृहिणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार जळगावच्या या भोंदूबाबाने डोंबिवलीत येऊन करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल ३२ लाख १५ हजार ८७५ रुपयांचा गंडा घातला आहे. त्यावर गुन्हा दाखल होताच डोंबिवली पोलिसांनी या तरुण भोंदूबाबच्या मुसक्या आवळल्या. शनिवारी (ता.22 जानेवारी) पहाटेच्या सुमारास त्याला जळगावतून अटक केली असून पवन बापुराव पाटील (वय २८) असे त्याचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील गंजेवाडा येथे आपला दरबार चालवत होता. या दरबारात तो लोकांना बोलवून अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवत लोकांना गंडे दोरे देत फसवत होता.

Crime News
पटोले आले तर त्यांना कपडे फाटेपर्यंत मारू; भाजप शहराध्यक्षाचा इशारा

फिर्यादी महिलेच्या तक्रारीनूसार या भोंदूबाबाने डिसेंबर २०१९ पासून डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे येथील ओम साई सोसायटीतील आपली आई राहत असलेल्या घरी येऊन घरातील सर्वांना भुरळ घातली. यानंतर त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कुंकु व सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच, करणी केल्याची भीती घालत ती काढण्यासाठी खर्च करावा लागणार असे सांगत आपल्या व आईच्या खात्यामधून डिसेंबर २०१९ पासून ते आतापर्यँत ३१ लाख ६ हजार ८७४ इतके पैसे ऑनलाईन माध्यमाद्वारे घेतले. तसेच, १ लाख ९ हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या, असे एकूण ३२ लाख १५ हजार ८७४ रूपये घेतल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या या भोंदूबाबाला कोर्टाने दोन पोलिस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या आरोपीला कशी अटक केली? की तो स्वतः पोलिसांकडे हजर झाला? हे गुपित अद्यापही गुलदस्त्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.