Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात संत तुकारामांच्या ओव्या अन् महाराष्ट्राला पंचामृताचा प्रसाद !

Devendra Fadnavis: अर्थसंकल्प लोकहिताचा असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Sant Tukaram and Budget: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी तो सोपा करून सांगितला. अमृतमहोत्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा हा पंचामृत अर्थसंकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या पंचामृत अर्थसंकल्पाला आकर्षक करण्यासाठी संत तुकारामांच्या ओव्यांचा योग्य पद्धतीने वापर करण्यात आला होता.

तुकाराम बीजेच्या दिवशीच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प जनतेच्या हितासाठी असल्याचा दावा करण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, "आज तुकाराम बीज जगदगुरु तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन। ज्याची आस करी जन॥’ या तत्वास अनसुरुन अर्थसंकल्प आहे." त्यानुसारच अनेक योजनांच्या सुरुवातीला फडणवीस यांनी संत तुकारामांच्या ओव्या म्हटल्या. त्यातून त्यांनी योजनांचा अर्थ थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

Devendra Fadnavis
Satara : चांगले काम करा, लोक तुमचेही पेंटिंग काढतील : उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना सल्ला

या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करण्यासाच्या दृष्टीने अनेक योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. 'सन्मान आपल्या युगपुरुषांचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा' असे म्हणत फडणवीसांनी योजना जाहीर केल्या.

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्षे. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये

- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी

- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचिरत्रावरील उद्याने : २५०

कोटी रुपये

- शिवनेरी किल्लयावर शिवछत्रपती या जीवनचिरत्र्यावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे

संवर्धन : ३०० कोटी रुपये

'लाडकी लेक मी संतांची मजवर कृपा बहुतांची' असे सांगत मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरुपात मांडली. या योजनेत मुलींना विविध टप्प्यात कसा फायदा होईल याकडे लक्ष दिले आहे.

- पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ

- जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये

- पहिलीत चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये

- अकरावीत आठ हजार रुपये

- मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५ हजार रुपये

Devendra Fadnavis
Budget : राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा अन् विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा अर्थसंकल्प !

हा अर्थसंकल्प पंचामृत म्हणजे पाच ध्येयावर आधारित असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते. त्यातील एक ध्येय म्हणजे पर्यावरणपूरक विकास. या ध्येयाबाबत सांगताना फडणवीसांनी 'झाडे झुडे जीव सोईरे पाषाण' या ओवीचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी या ध्येयासाठी काय करणार त्याची यादी सांगितली. यात राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यात

- २० हजार ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प

- भुसावळ येथे पाचशे किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार

- जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती

- शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट

- हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात ७५ हजार कोटीची गुंतवणूक अपेक्षित

- १५ वर्षे जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार

- ८ ते १५ वर्षात खासगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत

- एसटी महामंडळात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस

- डिझेलवरील पाच हजार बसेस द्रवरुपी नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार

- पर्यावरण सेवा योजनेचा सात हजार ५०० शाळांमध्ये विस्तार

- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ तलाव संवर्धनाचा कार्यक्रम

- प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती

- ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन

- धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई

- औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी ५० हायटेक रोपवाटिका

- गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी करणार

- शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी

Devendra Fadnavis
Mla Satish Chavan Reaction On Budget : हा तर विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प

राज्यात वारीची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. या वारीसाठीही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. ती सांगताना फडणवीस यांनी 'नाचू कीर्तनाचे रंगी आम्ही सारे वारकरी' या ओवीचा आधार घेतला. या योजनेमुळे राज्यातील वारकऱ्यांना फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20

कोटी

- कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत

नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना

मराठी भाषेसाठीही या अर्थसंकल्पात आकर्षक तरतूदी केल्या आहेत. या तरतूदींच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करीत असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. 'बोलतो मराठी, वाचतो मराठी, माय मराठीच्या सेवेसाठी' असे म्हणत त्यांनी राज्यात मराठी भाषेसाठी काय तरतूदी केल्या आहेत ते सांगितले.

- श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार

- विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन एरोली येथे इमारतींची कामे

- मराठी भाषा प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे

- सांगली नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपये

- राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी

- दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी ११५ कोटी

- कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कल्याण मंडळाची स्थापना

- विदर्भ साहित्य संघाला शताब्दीदिनानिमित्त १० कोटी रुपये

- स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता ५० कोटी रुपये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com