Pocso Special Court : मुलीला 'आयटम' संबोधणे लैंगिक शोषणच!

Pocso Special Court : 'क्या आइटम किधर जा राही हो' म्हणत तिची छेड काढली.
Pocso
PocsoSarkarnama

मुंबई : पॉक्सो न्यायालयाने (Pocso Special Court) आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिले आहे. एखाद्या मुलीला आयटम असे बोलणे, तसे संबोधन करणे लैंगिक शोषणापेक्षा कमी नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. एका प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने असे मत नोंदवले.

२०१५ साली एक सोळा वर्षीय मुलगी शाळेतून घरी परतत होती. ती वाटेत जात असताना एका २५ वर्षीय व्यावयासिकाने तिची वाट अडवून, 'क्या आइटम किधर जा राही हो' म्हणत तिची छेड काढली. तिचे केसही ओढले. यानंतर संबंधित मुलीने त्या व्यावसायिकाविरूद्ध दिलेल्या तक्रारीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांच्यासमोर सुनावणी झाली. आता आरोपीला दीड वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली.

Pocso
Bhayyu Maharaj : सुशांत, हिमांशू रॅाय, भय्यू महाराज यांना तो क्षण टाळता आला असता...

मात्र याप्रकणाध्ये आपल्याला चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आले आहे, असा दावा आरोपीच्या वतीने करण्यात आलं. कारण, संबंधित मुलीच्या कुटुबियांना दोघांच्या मैत्रीला विरोध होता. त्यामुळे आपल्याला प्रकरणात खोट्या पद्धतीने प्रकरणात खोटेपणाने गोवण्यात आल्याचेही आरोपीतर्फे सांगण्यात आले होते. मात्र आरोपीने केलेला मैत्रीचा युक्तिवाद पीडित मुलीने जबाबात कुठेही नोंदवलेला नाही.

Pocso
'आयटम आहे का' असे म्हणणाऱ्या शिवसैनिकाला महिलेकडून चोप ; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, आता एखाद्या मुलीला आयटम असे संबोधणे लैंगिक शोषणाच्या स्वरूपाचा गुन्ह्यासारखे आहे, असे मत न्यायालयाने नोंदवल्याने या निर्णयाकडे एक वेगळा आणि स्वागतार्ह असल्याची चर्चा होत आहे. यामुळे एक चांगला पायंडा पडल्याची भावना व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com