मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे संतापले

PM Narendra Modi | Maharashtra Visit | : देहूतील अजित पवारांच्या वादानंतर मुंबईत नवा वाद
PM Narendra Modi | Maharashtra Visit
PM Narendra Modi | Maharashtra VisitTwitter

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पुण्यातील देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पार पडले. यानंतर ते मुंबईतील राजभवनातील कार्यक्रमासाठी रवाना झाले. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात वादाचा अंक सुरु असल्याच पाहायला मिळतं आहे.

देहूमधील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण न करु दिल्याने कार्यक्रम वादग्रस्त ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या घटनेवर टीका करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या घटनेचा वाद ताजा असतानाच मुंबईत पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी आयएनएस शिक्रा येथे गेले होते. तिथून निघताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्र निघाले. मात्र यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून आदित्य ठाकरे यांना उतरवण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात येत आहे. यावरुन मुख्यमंत्री देखील संतापले असे वृत्त आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावरुन टीका केली आहे.

दरम्यान देहूमधील कार्यक्रमही वादात अडकला आहे. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केलं. पण याच कार्यक्रमात मोदींशेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु दिले नाही. त्यांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयातून परवानगी नव्हती असे आता समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com