Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Narendra Modi News : अकार्यक्षम मंत्र्यांना मोदी ड्रीम टीममधूनही डच्चू मिळणार..

Narendra Modi News : मोदींची ड्रीम टीम यंदा १० राज्यांत विधानसभा निवडणुका आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळणार आहे.

Narendra Modi News : येत्या १५ जानेवारीच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये (pm Narendra Modi) मोठे फेरबदल होणार आहे.

या मंत्रीमंडळातील फेरबदलापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. याबरोबरच काही कॅबिनेट मंत्र्यांना पुन्हा संघटनेत पाठवणार असल्याची विश्वसनीय माहिती आह. मोदींच्या ड्रीम टीमची स्थापना 18 ते 25 जानेवारीदरम्यान करण्यात येणार असल्याचे समजते.

मंत्र्यांच्या फेरबदलाचे संकेत काही दिवसापूर्वी देण्यात आले आहे. त्यांचे प्रगतीपुस्तक मोदींनी मागितले आहे. (Modi Cabinet Reshuffle news update) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अंतिम फेरबदल आहेत.

मोदींची ड्रीम टीम यंदा १० राज्यांत विधानसभा निवडणुका आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळणार आहे. त्यासाठी साडेतीन हजार संघटकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Narendra Modi
Bachchu Kadu accident news : आमदार बच्चू कडू यांचा अपघात ; डोक्याला गंभीर दुखापत

यंदा कर्नाटक, तेलंगण, मप्र-छग, राजस्थान, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरात निवडणुका आहेत. जम्मू-काश्मीरातही शक्यता आहे. यापैकी ६ राज्यांतील सरकार वाचवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात तेथील नेत्यांना संधी देण्यावर भर राहील. अकार्यक्षम मंत्र्यांना ड्रीम टीममध्ये स्थान मिळणार नसल्याचे संकेत आहेत.

फेरबदल झालेल्या मंत्र्यांना आपल्या कामाचे स्वरुप समजून घेण्यासाठी किमान पंधरा दिवसाचा कालावधी आवश्यक आहे. त्यासाठी नवीन मंत्र्यांना खात्याची माहिती तसेच अधिवेशनात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर समजून घेण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी मिळणे आवश्यक आहे.

Narendra Modi
BJP News : नऊ राज्य जिंकण्यासाठी भाजपची रणनीती ठरली ; साडेतीन हजार संघटक मैदानात उतरणार

मोदी सरकारमधील सध्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मनसुख मांडवीय, निर्मला सितारमन, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, स्मृती इराणी वगळता अन्य मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचे बोलले जाते.

ती दोन नावे कोणती?

मोदी सरकारच्या या फेरबदलात शिंदे गटालाही संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे समजते. शिंदे गटाच्या कोणत्या दोन जणांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे गुलदस्त्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com