पवारांना मोदींचा 'स्लो डाऊन'चा सल्ला अन् प्रफुल्ल पटेलांचा हजरजबाबीपणा

पवार साहेबांचे वय पाहता त्यांना 'स्लो डाऊन' करण्याचा सल्ला मोदींनी दिला होता. तब्येतीची काळजी घ्यावी असेही सांगितले.
Sharad Pawar, narendra modi
Sharad Pawar, narendra modisarkarnama

मुंबई : "शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत, त्यांनी शेती क्षेत्रात चांगलं काम केलं, असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचा एक किस्सा आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला. निमित्त होते पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाचे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस (Sharad Pawar 81 Birthday) आहे. त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक नेते उपस्थित होते.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना काही दिवसापूर्वी मी दिल्लीत भेटलो होतो. राज्यात नैसर्गिक संकट असो वा कोणती घटना असो शरद पवार त्याठिकाणी पोहचतात यामुळे पंतप्रधानांनी ती चिंता वयोमानाने व्यक्त केली होती. या भेटीत मोदींनी शरद पवारांच्या वेगवान दैाऱ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. साहेबांचे वय पाहता त्यांना 'स्लो डाऊन' करण्याचा सल्ला मोदींनी दिला होता. तब्येतीची काळजी घ्यावी असेही सांगितले होते,'' त्यावर पटेलांनी ''पवार साहेब थांबणार नाही,'' असं हजरजबाबी उत्तर मोदींना दिलं होतं.

''पवार साहेब हे जनसंपर्काच्या बाबतीत कोणाचेही ऐकणार नाहीत. जनसंपर्क हीच त्यांची ऊर्जा आणि टॉनिक आहे. लोकांमध्ये मिसळूनच त्यांना रात्रंदिवस टॉनिक मिळत असते. हे लोकच त्यांची ऊर्जा आहे,''असे स्पष्टीकरण पटेलांनी त्यावेळी मोदींना दिले होते.

''महाराष्ट्राच्या नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली, त्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत,'' असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.

''आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही,'' असे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.

ते म्हणाले, ''बिहार, पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर त्यांचे नेते शरद पवार यांना भेटायला येतात. हर अर्जुन का सारथी हेच ते. तुम्हाला आम्हाला लढावे लागेल. त्यांचासमतेचा विचार मनात घ्यावा लागेल. भुज भूकंपवेळी शरद पवार यांनी केलेल्या कामाची वाहवा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com