गरिबांच्या खिशाला भुर्दंड; केसपेपर अन् मलमपट्टीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार

पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेमध्ये केसपेपर आणि मलमपट्टीसाठी शुल्कवाढ केली आहे
Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेची रुग्णालये (८) व दवाखान्यात (२९) आतापर्यंत अत्यल्प दरात औषधोपचार मिळत होते. आता मात्र, त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण शासन दराप्रमाणे आकारणी करण्याचे धोरण पालिकेने आता तयार केले आहे. त्याला पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी मान्यताही दिली आहे. त्यानुसार केसपेपर व ड्रेसिंगचे शुल्क दुप्पट होणार आहेत. दरम्यान, ही नवी शुल्करचना कधी अंमलात आणणार याचा निर्णय पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील हे लवकरच घेणार आहेत.

दरम्यान, अंमलबजावणीपूर्वीच या धोरणाला राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), कॉंग्रेस (Congress) आणि एमआयएमने कडाडून विरोध केला असून ते मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे ते आता त्याची दखल घेतात का याकडे लक्ष लागले आहे. ते हा विरोध डावलून नव्या धोरणानुसार शुल्क आकारणी याच आठवड्यात लागू करण्याची शक्यता आहे.

Pimpri-Chinchwad
धो-धो पावसामुळे पुण्याचे दिवसाआड पाणी झाले बंद, पिंपरीत मात्र 'जैसे थे'

महापालिकेच्या वैद्यकीय सेवा सुविधा व औषधोपचाराकरीता शासन दराप्रमाणे आकारणी झाली, तर अधिक पैसे मोजावे लागतील, याला पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी यापूर्वीच दजोरा दिला आहे. परिणामी पालिका रुग्णालयातील गोरगरिबांचे उपचार घेणे महागणार आहे. गेल्या १२ वर्षापासून या दरात बदल तथा वाढ करण्यात आली नव्हती. राज्य सरकारने त्याबाबत तसा निर्णय पाच वर्षापूर्वी घेऊनही ती केली गेली नव्हती, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.

नवे वैद्यकीय उपचार शुल्क धोरण म्हणजे राज्य शासनाच्या या दर आकारणीला विरोध सुरु असताना प्रशासनाने आज हे धोरण तथा सरकारी दर व पालिकेचे त्यासाठीचे सध्याचे दर जाहीर केले. त्यानुसार केसपेपर काढण्यासाठी व ड्रेसिंगकरिता दहा रुपये लागत होते. ते आता डबल होणार आहेत. कारण शासकीय दरानुसार त्यासाठीचे शुल्क वीस रुपये आहे. मोठ्या साईजचे एक्सरे काढणे, सोनोग्राफी करणेही आता महागणार आहे. आयसीयूचे बेडचार्जेस दुपटीहून जास्त होणार आहेत. दुसरीकडे रुग्णवाहिकेचे दर, मात्र कमी होणार आहेत. तर, सध्या औषधासाठी द्यावे लागणारे दहा रुपये आता द्यावे लागणार नाहीत.

Pimpri-Chinchwad
गंभीर गुन्ह्याचा तपास सोडून पिंपरी पोलिसांचे लक्ष दारु अन् गुटख्यावर

पिंपरी पालिकेची एकूण ८ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. शहराबाहेरील रुग्णांना त्यासाठी वीस टक्के अधिक फी द्यावी लागते. तर, ओपीडी रुग्णांच्या बाबतीत वास्तव्याचा पुरावा आवश्यक नसतो, असे महापालिकेचे सध्याचे धोरण आहे. नव्या धोरणात त्यात बदल करण्यात आलेला नाही. दारिद्रयरेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना मोफत उपचार पुर्वीप्रमाणेच असतील. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व पिवळ्या व केशरी शिधापत्रिका कार्डधारक रुग्णास मोफत मिळतील. मात्र, या योजनेत न बसणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या दरांनुसार आकारणी केली जाणार आहे. याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in