फोन टॅपिंग प्रकरण : संजय राऊतांचे बोलणे स्वतः रश्मी शुक्ला ऐकायच्या; अंमलदाराचा खळबळजनक जबाब

Phone tapping case| Rashmi Shukla| 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याच्या काळात खासदार संजय राऊतांचा जवळपास ६० दिवस फोन टॅप करण्यात आला होता.
Phone tapping case News, Rashmi Shukla News, Rashmi Shukla Phone tapping case
Phone tapping case News, Rashmi Shukla News, Rashmi Shukla Phone tapping case

Phone Tapping case latest news update

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन होण्याच्या काळात खासदार संजय राऊतांचा जवळपास ६० दिवस फोन टॅप (Phone tapping) करण्यात आला होता. या प्रकरणी सुरु असलेल्या तपसादरम्यान एका अंमलदाराने जबाब नोंदवला आहे. त्यामुळे शुक्ला यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

''रश्मी शुक्ला स्वत: खासदार संजय राऊत यांचे कॉल ऐकायच्या.फोन टॅपिंग टीममध्ये मुख्य गुप्तचर अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांसारख्या 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. रश्मी शुक्ला स्वत: संजय राऊत यांचे फोन ऐकायच्या. राऊत कोणाला भेटतात, कोणाशी बोलतात, फोनवर त्यांचे काय संभाषण होते, यावर लक्ष ठेवण्याचे आदेश होते. त्यांचे कॉल ऐकून याचा रिपोर्ट वरिष्ठांना द्यावा लागायचा.'' असे संबंधित अंमलदाराने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

Phone tapping case News, Rashmi Shukla News, Rashmi Shukla Phone tapping case
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

फोन टॅप करताना संजय राऊतांचा उल्लेख एस. रहाटे असा करण्यात आला होता. पण अंमलदाराने राऊतांचा आवाज ओळखला. राऊत कोणासोबत बोलतात, काय बोलतात, कोणत्या बैठकांचा उल्लेख करतात, मातोश्री आणि सह्याद्री अतिथीगृहाबद्दल काय बोलतात, याची नोंद ठेवण्याचे आणि त्याचा रिपोर्ट देण्याचे आदेश रश्मी शुक्लांनी त्यावेळी दिले होते. इतकेच नव्हे तर हे फोन टॅपिंग प्रकरण वैध्य आहे की अवैध्य हे आपल्यालाही माहित नसल्याचं या अंमलदाराने आपल्या जबाबात सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता स्थापनेच्या काळात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा समोर आला होता. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी 2 मार्च रोजी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 700 पानांचा अहवाल दाखल केला आहे. यात एकूण 18 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या 18 जणांमध्ये 2019 मध्ये राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असलेल्या एका अंमलदाराचाही समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com