Amruta Fadnavis Blackmail Case: फडणवीस प्रकरणात जयसिघांनीच्या अडचणी वाढल्या ; अटक बेकायदेशीर...

Anil Jaisinghani News update : अटक बेकायदेशीर नाही..
Anil Jaisinghani News update :
Anil Jaisinghani News update :Sarkarnama

Anil Jaisinghani News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याचा भाऊ निर्मल यांना करण्यात आली आहे. ही अटक बेकायदा असल्याचा दावा त्यांनी उच्च न्यायालयात केला होता.

जयसिघांनी याची ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. "अनिल जयसंघानीला झालेली अटक बेकायदेशीर नाही," असे उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

"आपल्याविरोधातील गुन्हा हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तो रद्द करण्याच्या मुख्य मागणीसह आपली अटक बेकायदा ठरवून याचिका निकाली निघेपर्यंत आपली अंतरिम जामिनावर सुटका करण्याची मागणी जयसिंघानी बंधूंनी केली होती.

Anil Jaisinghani News update :
Pune BJP : धक्कादायक : बापटांच्या निधनाच्या दिवशीच दीडशे कोटींची निविदा मंजूर करून घेणारा भाजपचा नेता कोण ?

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठासमोर जयसिंघानी याच्या वकिलाने गुरुवारी ही याचिका सादर केली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्याने केली होती. ही याचिका आज (सोमवारी) न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे जयसिघांनीला दिलासा मिळालेला नाही.

जयसिंघानी बंधूंच्या याचिकेनुसार, गुजरात पोलिसांनी त्यांना १९ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजता गोध्रा येथून ताब्यात घेतले. अहमदाबाद येथे त्यांच्यावर एक गुन्हा दाखल असतानाही त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Anil Jaisinghani News update :
Congress News : काँग्रेसच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना ; अनेक नेते जखमी ; Video व्हायरल

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुंबईला आणताना गुजरात येथील संबंधित दंडाधिकाऱ्यांकडून त्यांची ट्रान्झिट कोठडी घेणे अपेक्षित होते. मात्र मुंबई पोलिसांनी तसे केले नाही. मुंबईत आणल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता म्हणजेच ३६ तासांनी सत्र न्यायालयात कोठडीसाठी उपस्थित करण्यात आले. कायद्यानुसार ही वेळ २४ तासांची आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

अमृता फडणवीस यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी २० मार्च रोजी अनिल आणि त्याची मुलगी अनिक्षा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. अमृता यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com