पेगासस हेरगिरी प्रकरण: भाजपने उधळले कॉंग्रेसचे आंदोलन

पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरून काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर मोर्चा काढणार होते.
Congress BJP Protest
Congress BJP Protest

मुंबई : पेगासस हेरगिरी प्रकरणी कॉंग्रेस (Congress) नेते जीशान सिद्दिकी आज भाजप (BJP) कार्यालयाबाहेर आंदोलन करणार होते. मात्र त्यांचा हा हेतू उधळून लावत बीजेपी कार्यकर्त्यांनी त्यांच्या आधीच रस्त्यावर येऊन आंदोलन सुरु केलं. ज्यामुळे मुंबईत दादर स्थानकाजवळ काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. मुंबई युथ काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आमदार झिशान सिद्दीकी (Zishan siddhiki) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Congress BJP Protest)

पेगासस हेरगिरीच्या मुद्यावरून काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर मोर्चा काढणार होते. मात्र, त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आज आपल्याच देशात नागरीक सुरक्षित नाहीत. प्रत्येक नागरिकाची हेरगिरी केली जात असून फोन टॅपिंगचा प्रकार सुरू आहे. पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी केली जात असल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केली. दरम्यान, काँग्रेस आंदोलक दादरमधील भाजप कार्यालया बाहेप आंदोलन करण्यासाठी जाणार होते. मात्र, पोलिसांनी वाटेतच अडवत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Congress BJP Protest
राज ठाकरे म्हणाले, सध्या तरी स्वबळावर..

तर, दूसरीकडे, काॅंग्रेसच्या लोकांना आता काम उरललं नाही म्हणून अशी आंदोलन करत आहेत. जे विषय संपलेले आहेत. ते पून्हा उचलून धरत आहेत. पण भाजपचे कार्यकर्ते शारिरीक व मानसिक रित्या लढा देण्यासाठी सक्षम आहेत, असे म्हणत भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

वाईन आम्ही पित नाही त्यामुळे आम्हाला त्यातला फरक कळत नाही, हा काय तमाशा सुरू आहे. गांजा सापडला की हार्बल वनस्पती म्हटलं जातं, मग वाईन शाॅपचं नाव बदलून अमृत शाॅप करा. काही लोका़चं भलं करण्यासाठी हे सुरू आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असल्याचं सांगितलं जातं, मात्र गेल्या दोन वर्षात त्यांना भरपाई दिली गेली नाही त्याचं काय? असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला फटकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in